मान्यताप्राप्त दुकानांच्या कालावधी वाढवा

0

नवापूर: कोरोना लॉकडाऊन कालावधीमधील मान्यताप्राप्त दुकानांच्या कालावधी वाढवण्याची मागणी भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे नंदुरबार जिल्हा कार्याध्यक्ष दिलीप नाईक यांनी तहसीलदार यांच्याकडे केली आहे

शासनाच्या आदेशाप्रमाणे व्यापारी दुकानांच्या वेळा  ठरवून दिलेल्या आहेत. नंदुरबार जिल्ह्यात नवापूर शहरातील दुकानांची वेळ इतर तालुक्यांपेक्षा वेगळी आहे असे नाईक यांनी म्हटले  आहे. नंदुरबार जिल्हा पूर्ण कोरोणामुक्त झालेला आहे. नवापूर तालुक्यात आधीपासूनच एकही रुग्ण नाही त्यामुळे दुकानांच्या वेळा बदलण्यास हरकत नसावी. कमी वेळ दुकाने उघडी ठेवल्यामुळे एकाच वेळी गर्दी होऊन सोशल डिस्टन्सींग राहत राहत नाही .वेळ कमी आणि गर्दी जास्त त्यामुळे बाजाराला जत्रेचे स्वरूप येत आहे.
शेतीसाठी लागणारी खते,बियाणे,औषधे घेण्यासाठी आलेल्या शेतकर्याना अधिक खर्च करुन गावाबाहेर माल आणावा लागतो.असे अनेक प्रश्न निर्माण होत आहेत.
आपणास विनंती की शासनाने मान्य केलेली व्यवस्थापने आणि दुकाने सकाळी ८ ते २ आणि दुपारी ४ते ७ यावेळेत उघडी ठेवणे बद्दल निर्णय घ्यावा           अशी मागणी नाईक यांनी       केली आहे.

Copy