मानसी वाघमारेचा प्रथम क्रमांक

0

भुसावळ। येथील सिद्धेश्‍वर नगरातील रहिवाशी व प.क. कोटेचा महिला महाविद्यालयातील 11 वी कला शाखेची विद्यार्थीनी मानसी दीपक वाघमारे हिने 650 पैकी 508 (78.16 टक्के) गुण मिळवून महाविद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

तीच्या या यशाबद्दल संस्थाध्यक्षा पद्मा कोटेचा, संचालक दीपेश कोटेचा, मोनिका कोटेचा, प्राचार्या डॉ. मंगला साबद्रा, पर्यवेक्षक प्रा.आर.बी.भदाणे यांच्यासह प्राध्यापकांनी कौतुक केले. मानसीला प्रा.स्मिता जयकर यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.