मानराज मोटारच्या गुन्ह्यात पाचही संशयीतांना पोलिस कोठडी !

0

जळगाव : स्थानिक गुन्हेशाखेच्या पथकाने भुसावळ येथून मोबाईलदुकान फोडणार्‍या टोळीचा छडा लावला होता. अटकेतील तीघांसह दोन अल्पवयीन संशयितांनी एकूण आठ शोरुम फोडल्याची कबुली दिली असुन त्यांच्या कडून 1 लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अल्पवयीन असल्याने दोघांना बाल न्यायालयात हजर करण्यात आले तर उर्वरीत तिघांना जिल्हा न्यायालयात हजर केले असता, तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

गुन्हेशाखेने अटक केलेल्या राहुल कमल मोहिते (वय-21), सोनू नागुलाल मोहिते(वय-21), बाळू शामलाल चव्हाण(वय-25 कुर्‍हे पानाचे) या तीन जणासह दोन अल्ववयीन मुलांना एमआयडीसी पोलिसांत दाखल गुन्ह्यात वर्ग करण्यात आले आहे. मानराजपार्क या मारुती कारच्या शोरुम मध्ये संशयीतांनी 17 डिसेंबर रोजी 4 लाख रुपयांची रोकड लंपास केली होती. पोलिसांनी अटकेनंतर ंसशयीतांकडून एकाच कंपनीचे पाच मोबाईल, 9 हजार 600 रुपये रोख, लोखंडी टॉम्या दोन, असा एकूण 1 लाख 30 हजार 600 रुपयांचा ऐवज जप्त केला असून सोमवारी दुपारी त्यांना न्या. अक्षी जैन यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने तीन संशयीतांना 26 दिवस पोलिस कोठडी सुनावली सरकारपक्षातर्फे अ‍ॅड. गिरीश बारगजे यांनी कामकाज पाहिले.

Copy