मानमोडे येथे जिल्हाधिकाऱ्यांची मग्रारोहयो अंतर्गत सीसीटी कामाची पाहणी

0

असलोद:शहादा तालुक्यातील मानमोडे येथे जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारूड यांनी नुकतीच मग्रारोहयो अंतर्गत सीसीटी कामाची पाहणी केली.

सीसीटीचे काम ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मुख्य उद्देश आहे. प्रत्येक गावाने जास्तीत लोकाना रोजगार उपलब्ध करून द्यावा. मजुराना काम मिळेल व हातात पैसा येईल, त्याचप्रमाणे वृक्ष लागवडही काळाची गरज आहे. ‘जल नही तो कल नही’ या उद्देशाने वृक्ष लागवडीचा कार्यक्रम प्रत्येक गावातील वनपरिक्षेत्रात गावठाण पडीत जागेत जास्तीत जास्त वृक्ष लागवड करण्याचे काम पावसाळ्यात हाती घ्यावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते मजुरांना टोप्या वाटप करण्यात आल्या.

कार्यक्रमासाठी प्रांताधिकारी चेतन गिरासे, तहसीलदार कुलकर्णी, कृषी विभागाचे उपविभागीय कृषी अधिकारी जोशी, तालुका कृषी अधिकारी हडपे, वनविभागाचे पवार, मंडळ कृषी अधिकारी राहुल धनगर, कृषी पर्यवेक्षक बागुल, पत्रकार दिनेश पवार, पंचायत समिती सदस्य गोपी पावरा, सरपंच रेखा ठाकरे, उपसरपंच योगेश पावरा, कृषी सहाय्यक भिकुबाई पावरा,ग्रामसेवक मुकेश जाधव,तलाठी कोठारी आप्पा, जेष्ठ नागरिक उजन बर्डे,रामसिगं डुडवे, पाणी फाऊंडेशन टीम मानमोडे, कृषी विभाग शहादा, वनविभाग शहादा, जि.प.शाळा, मानमोडे महिला बचत गट उपस्थित होते.

Copy