माथेफिरूकडून मध्यरात्री रिक्षा पेटविण्याचा प्रयत्न

0

* मध्यरात्री रात्री 3-4 वाजेचा प्रकार
* परिसरातील नागरीकांचा संताप
* माथेफिरूविरोधात शनिपेठ पोलीसात तक्रार

जळगाव – गेल्या महिन्यात जोशी पेठेतील तीन मोटारसायकली जाळल्याचा प्रकार ताजा असतांना आताकांचननगरातील रिक्षा चालकाच्या घरासमोर उभी असलेली रिक्षावर अज्ञात माथेफिरूने रॉकेल टाकून पेटवून दिल्याचा प्रकार शनिवारी 13 ऑक्टोबर 2018 सकाळी 3 वाजेच्या सुमारास उघडकीस आला. मात्र काही तरूणांच्या सतर्कतेने लावलेली आग विझविण्यात आली असून रिक्षाचे होणारे मोठे नुकसान टळले आहे. याबाबत शनिपेठ पोलीसात अज्ञात माथेफिरूविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मिळालेली माहिती अशी की, सुरेंद्र उर्फ गुड्डू विजय हरदे रा. सद्गुरू किराणा स्टोअर्स जवळ, कांचन नगर हे रिक्षाचालक असून त्यांनी सहा महिन्यांपुर्वीच नविन रिक्षा क्रमांक (एमएच 19, सीडब्ल्यू 0795) घेतली असून आपला उदरनिर्वाह करतात. 13 ऑक्टोबर रोजीच्या पहाटे 3 ते 4 वाजेच्या सुमारास अज्ञात माथेफिरूंनी रिक्षावर रॉकेल टाकून पेटवून दिले. हा प्रकार तेथे अपस्थित असलेले तरूणांनी पहिले असता अज्ञात तरूणास हटकले. यावर अज्ञात माथेफिरूने आणलेल्या मोटारसायकलने पळ काढला. रिक्षाला लागलेली आग तरूणांच्या मदतीने विझविण्यात आली. या आगीत रिक्षाचे पुढील व मागील सिटी पुर्णपणे जळून खाक झाले आहे.

नागरीकांमध्ये भितीचे वातावरण
गेल्या अनेक दिवसांपासून दुचाकी पेटविणे, दुचाकीतीन पेट्रोल चोरीस जाणे, सिटवर ब्लेड मारणे असे प्रकार घडत आहे. याकडे शनिपेठ व शहर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी दुर्लक्ष करीत आहे. रात्री पोलीसांची गस्तीची नियुक्ती असतांना पोलीस पेट्रोलिंग करीत नसल्याची आरोड कांचननगर, शनिपेठ, बळीराम पेठेतील नागरीकांमधून होत आहे. पोलीसांची गस्त नसल्याने नागरीकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महिनाभरापुर्वी पेटविल्या होत्या तिन दुचाकी
गुरूवारी 8 सप्टेंबर 2018 रोजी रात्री नवीन जोशी कॉलनीत राहणार्‍या कविता अशोक वैद्य यांची दुचाकी क्रमांक एमएच 19 बीडी2867, गिरीश रामदास जाधव यांची दुचाकी क्रमांक एमएच 19 बीआर 5422, सुहास जाधव यांची दुचाकी क्रमांक (एमएच 19 सीई 9526) यांची दुचाकी 1.30 च्या सुमारास जाळण्यात आल्या होत्या. आगीचे लोळ आणि धुर दिसल्यानंतर परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. नागरिकांनी पाणी ओतून आग विझविली होती. आता रिक्षा पेटवून दिल्याचा प्रकार झाल्याने नागरीकांमध्ये भितीसह तिव्र संताप व्यक्त होत आहे.

Copy