Private Advt

माथेफिरूंनी तब्बल नऊ वाहने जाळली : जळगावच्या आदर्शनगरातील प्रकार

जळगाव : माथेफिरूने शहरातील तीन घटनांमध्ये तब्बल नऊ वाहने पेटवल्याचा धक्कादायक प्रकार शुक्रवारी पहाटेच्या सुमारास उघडकीस आला. या प्रकाराची गंभीर दखल पोलिसांनी घेतली असून सीसीटीव्हीच्या आधारे वाहने पेटवणार्‍यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. रामानंद नगरचे पोलीस निरीक्षक शिंदे व सहकार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

पहाटेच्या सुमारास लावली आग
आदर्श नगर प्लॉट क्रमांक 186 आराध्या अपार्टमेंट डी मार्टच्या मागील बाजूस व बाजूच्या घरांच्या कंपाऊंडमधील ठेवलेल्या वाहनांना अज्ञाताने आग लावली. याबाबत अशोक राणे यांनी फोनद्वारे अग्निशमन दलास माहिती दिली. अग्निशमन दलाचे बंब घटनास्थळी गेले असता नागरीकांनी त्यापूर्वीच आग विझवली होती. यात आगीत सँट्रो (एम.एच.19 ए.पी. 1345) व क्रेटा (एम.एच.19 सी.व्ही. 9440) व इतर दोन मोटरसायकलींचे मोठे नुकसान झाले तर आदर्श नगरातील सृष्टी अपार्टमेंटमध्ये देखील वाहनांना आग लावण्यात आल्याचा प्रकार उघड झाला. याबाबत पूजा पंजाबी यांनी अग्निशमन दलास कळविले होते. यात सृष्टी अपार्टमेंटमध्ये एक मोटर सायकल व एसडी हाईट्समध्ये एक चारचाकी व तीन मोटरसायकल जाळण्याचा प्रकार उघड झाला आहे. यात के्रटा (एम.एच.19 के.4236) व तीन दुचाकी वाहनांचा समावेश आहे. यात आदर्श नगर परिसरात एकूण 6 दुचाकी व 3 कार जळून खाक करण्यात आल्या आहेत. अग्निशमन दलाचे वाहन चालक विक्रांत घोडेस्वार, वाहन चालक नंदकिशोर खडके, वाहन चालक वसंत दांडेकर, फायरमन भगवान जाधव, रवी बोरसे यांनी आग विझवली.