मातोश्रीवर थंडावले माजी महापौर विनायक पांडेंचे बंड

0

नाशिक । सेनेने मुलाला उमेदवारी दिली नाही म्हणून नाराज झालेले माजी महापौर विनायक पांडे यांनी बंड पुकारले होते.याप्रकरणी सेना महानगर प्रमुख यांना मारहाण केली होती. त्यामुळे हे गाजत असतांना पांडे यांना मातोश्रीवरून बोलवणे आल्यावर तेथे झालेल्या चर्चेत ते बंड थंडावले आहे. यापुढे सेनेसाठी व सेनेच्या उमेदवारांना जिकविण्यासाठी काम करण्याचे असल्याचे सांगितले. यावेळी माजी महापौर विनायक पांडे यांच्यासह ऋतुराज पांडे, सचिन भालेकर,दीपक गुरव,पुष्कराज गुरव,उमेश खाडे, सचिन बांडे,संतोष ठाकुर,संदीप कानडे आदी उपस्थित होते.

यापुढे शिवसैनिक म्हणून काम करू अशी ग्वाही!
मी आणि माझे कुटुंबिय कट्टर शिवसैनिक असून आम्ही शिवसेनेचे उमेदवार निवडून आणण्यासाठी प्रयत्न करू असे माजी महापौर विनायक पांडे यांनी सांगितले. मुलाला सेनेने उमेदवारी दिली नाही म्हणून महानगरप्रमुख अजय बोरस्ते यांना मारहाण करून बंडाचे हत्यार उपसले होते.त्यानुसार भारतीय जनता पार्टीने जाहीर केलेल्या ऐनवेळच्या यादीत त्यांचा मुलगा ऋतुराज पांडे आणि भावजय कविता पांडे यांचे नाव अधिकृत उमेदवार म्हणून प्रसिद्ध झाले होते.या सर्व पार्श्वभूमीवर शिवसेनेचे माजी महापौर विनायक पांडे यांना मातोश्रीवरून बोलावणे आले.आज शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतल्यानंतर त्यांचे बंड थंडावले असून आपण यापुढे शिवसैनिक म्हणून काम करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली.हे सेनेतर्फे केवळ आपली भावजय कविता पांडे या रिंगणात असून मुलगा ऋतुराज व मी निवडणूक लढविणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. तसेच भाजपाकडून त्याला तिकीट दिल्याच्या अफवा असल्याचेही ते म्हणाले. पांडे यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.