मातोश्रीत प्रवेश करण्यास शेतकरी कुटुंबाला मज्जाव; पोलिसांनी घेतले ताब्यात

0

मुंबई: शेती आणि कर्जाच्या समस्येबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर गेलेल्या शेतकरी आणि त्यांच्या एका लहान मुलीला पोलिसांकडून गैरवर्तवणूक मिळाली. पोलिसांनी त्यांना मातोश्रीत प्रवेश करण्यास मज्जाव केला. यावेळी किरकोळ वाद झाला असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले आहे. देशमुख असे या शेतकऱ्याचे नाव असून, ते मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी पनवेलवरून वांद्रे येथील मातोश्रीवर आले होते. या शेतकऱ्यावर कर्ज असून आपली समस्या घेऊन मुख्यमंत्र्यांची भेट घेण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्यांची भेट होऊ शकली नव्हती. अखेरीस आज रविवारी ते आपल्या लहान मुलीसह मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर आले. मात्र तेथे सुरक्षेसाठी तैनात असलेल्या पोलिसांनी त्यांना अडवले. त्यानंतर सदर शेतकऱ्याने मुख्यमंत्र्यांची भेट घेण्यासाठी सोडण्याची विनंती केली असता पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन पोलीस व्हॅनमध्ये बसवले. सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी त्यांना आता प्रवेश करण्यास रोखले. पोलिसांनी त्यांचे काम योग्य पद्धतीने केले आहे असे पोलिसांकडून सांगितले जात आहे.

Copy