मातृसेवा मंदिरात झाली गांधी जयंती साजरी

0

आकुर्डी : मातृसेवा विद्या मंदिर या शाळेत महात्मा गांधी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. मातृसेवा मंदीर व नचिकेत बालग्राम येथे म.गांधी जयंतीनिमित्त स्वच्छतेचा उपक्रम राबविण्यात आला.

सकाळी जनजागृतीपर प्रभातफेरी काढण्यात आली. यावेळी शाळेचे संस्थापक भागचंद ब्रम्हेचा उपस्थित होते. शाळेच्या सर्व मुलांनी व अध्यापक वर्गाने स्वच्छतेवर आधारीत घोषणा दिल्या. यानंतर शाळेचा परिसर विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी स्वच्छ केला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून विजय अगरवाल, भंगाळे सर, संस्थापक बाबुजी, मुख्याध्यापिका नयना मावळे तसेच शिक्षकवर्ग उपस्थित होता. यावेळी ब्रम्हेचा यांनी म.गांधी यांच्या जीवनावर मार्गदर्शन केले. मातृसेवा विद्या मंदिरात मुले रोजच शाळेची व परिसराची स्वच्छता करतात. म.गांधी जयंती व लाल बहादूर जयंतीनिमित्त शाळेत स्पर्धा घेण्यात आल्या. मुलांनी सुंदर घोषवाक्ये शाळेत लावली होती. शाळेची स्वच्छता झाल्यावर मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

Copy