माणसे गेली तरी सावल्या उरतात मागे!

0

एखाद्या घरात जेव्हा एखादा तरुण माणसाचा, स्त्रीचा वा कर्त्या व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला की, त्या घरात प्रश्‍नांची भिंत उभी राहते व सर्वच काय करावं आताफ म्हणत प्रश्‍नाथक चेहर्‍यांनी फिरत राहतात. जाणारा गेला पण प्रश्‍न ठेवून गेला. असही म्हटलं जात. म्हणून मी माणसे गेली तरी (प्रश्‍नांसह) सावल्या उरतात मागेफ हे शीर्षक घेत तुमच्यासमोर काही मांडू पाहतोय.

एक दुर्दैवी घटना घडली. तीही मी राहतो त्या भागात गल्लीत एका 23 वर्षीय अन् अभियांत्रिकीचं शिक्षण घेणार्‍या मुलीने नैश्यातून (?) राहत्या घरात आत्महत्त्या केली. आत्महत्त्या करण्यापूर्वी तिने एक ङ्गदिर्घफ चिठ्ठी लिहिली आणि चक्क आईवडिलांना दोषीफ ठरवत, आपल्यावर कसा अन्याय होतोय वगैरे लिहित स्वत:ची जीवनयात्रा संपवली. ज्या मुलीने आत्महत्या केली तिचे आईवडिल सुशक्षित, नोकरी करणारे व समंजस त्यांना 3 अपत्यं. आत्महत्या जिने केली. ती मोठी नंतरची बहीण बारावीत तर भाऊ दहावीत. बारावीतली बहीण हैद्राबाद येथे आयआयटीत बारावीचे शिक्षण घेतेय. जिने आत्महत्या केली तिचं म्हणणं होत. आयआयटीला मलाही जायचं होतं. पण आईवडिलांनी ते घडू दिलं नाही वा तशी ङ्गसाथफ दिली नाही वैगरे.

वरील आत्महत्यामागे तशी दोन कारणं त्या कारणाकडे वळण्याअगोदर मी एका गोष्टींकडे सर्वांचे लक्ष वेधू इच्छितो ती गोष्ट आहे. संवाद आज घराघरामधून हा ङ्गसंवादफ तसा बाद होत चाललाय जर झाला तर तो जुजबी वा संतापाची लढाई घडविणारा असतो समोरचा काही बोलतो, त्या हा प्रत्त्युत्तर देतो. संतापातून संताप वाढवं व शेवटी त्रागा, मत्सर, भांडण, मारामार्‍या वा सरळ आत्महत्त्या मधले मार्गच नाही. वाचकहो, माझे एक मित्र आहेत ते म्हणतात आयुष्यात येणार्‍या प्रत्येक प्रश्‍नांचे खरं मर्म एकच- चांगल्या वा वाईट अनेक घटना तुमच्या वाट्याला आयुष्यभर येणार त्यांची हाताळणी कशी करायची हे दुसरी कुठचीही शक्ती किंवा व्यक्ती ठरणार नसते. ते तुम्ही स्वत: ठरवायचं असतं. त्यासाठी त्या घटनेच्या सर्व अंगाच्या अभ्यास स्वत:ला करावा लागतो.

त्या अभ्यासासाठी जीवनभर स्पष्ट विचारांची साथ लागते व त्यासाठी संवाद हा खूप महत्वाचा.
संवाद का कमी होत चाललाय? साधं कारण आहे. मुळात आपल्याला दुसर्‍याला जे सांगायचे आहे. ते स्वत:ला आधी नीटपणे कळलेलं नसतं. जरी कळलं तरी ते नेमक्या शब्दात योग्य भावनाविष्कारांसह सांगता येत नाही. साधं बोलनही सूचत नाही. त्यातून होतो तो गोंधळ, गैरसमज व सुरू होते ती संतापाची लढाई, अहो, संवादात महत्त्व आहे. विचार आणि भावनांना. जेव्हा प्रत्यक्ष संवाद घडतो तेव्हा दोन्ही व्यक्ती आपापले विचार भावना, दृष्टीकोन, अपेक्षा, पूर्वग्रह यासकट व्यक्त होतात.
आज तसां सवांद होतोय. मोबाईल, संगणक, लॅपटॉप वगैरेच्या जमान्यात तो सरळ व सुसंवादी होतोय? प्रश्‍नच प्रश्‍न एक साधंसं उदाहरण घेऊ नया. ते एका ओवीतून घेऊन या तर ज्ञानेश्‍वर महाराज म्हणतात.
म्हणोनि संवादाचा सुवावो ढळे। तर्‍ही हृदयाकाश सारस्वते वोळे।
आणि श्रोता दुश्‍चिता तरि वितुळे। मांडला रसू।
याचा अर्थ आहे संवादाचा अनुकूल वारा सुटला की, हृदयकाश सारस्वताने भरुन येते. मग श्रोत्यांचे मन थार्‍यावर नसले, तरी वितळते व त्यातून रस उत्पन्न होेतो. इथे माझा प्रश्‍न आहे. समस्त पालकांना, पालकहो, मुलांना बोलाचयं असतं. काही तरी सांगायचं असतं. त्यांच्या सांगायला जीवनात त्यांच्या दृष्टीने रोज ककाहीतरी महत्त्वाचं घडत असतं. ते सर्व सांगायला ती मुलं उत्सुक असतात. त्यांना बोलू द्या. आपल्या भावना विचार, आठवणी त्यांना मांडू द्या. शालेय विद्यार्थ्यांसह वयात झालेल्या मुलामुलींना तर अवश्य बोलू द्या. वरील उदाहरणात म्हणजे, ज्या घरात आत्महत्त्या झाली तिथे कुणाचे चुकलं? 23 वर्षाची मुलगी शिकून सवरुन शहाणी होत आत्महत्त्या करत म्हणाली. आईबाबांनी माझा झळ केला.
मला मनाप्रमाणे पुढे जाऊ दिलं नाही. तिच म्हणणं
जरी बरोबर असलं व छोट्या बहिणीला ते आईबाबांनी दिले, हे जरी मान्य केलं तरी हेवा, मत्सर, स्पर्धा कुणाशी व का करायची? आणि आईवडिलांनी तरी मुलांमध्ये तुलना करत का भेदभाव करावा? आज त्या घरात शिकणार्‍या बहिणभावाला काय वाटत असेल? आम्ही मुलांना आमच्या प्रतिमेत अडकवण्याचा जो प्रयत्न करतोय, तोही इथे विचारात घ्यावा का?
आज विद्या मंदिरासह आद्यविद्या मंदिरात (घरात) जे घोळ सुरू आहेत, जे विविध प्रश्‍न उभे राहिलेय. दिवसागणिक उभे राहताय वा त्या समस्या आपण प्रचंड बाऊ करतं ये हमारे बसकी बात नही है असं म्हणत दूर ढकलतोय त्यांना कुणी जवळ करत उत्तरं शोधायची हो? आणि समाजातील शिक्षकम्हणवणार्‍या प्राण्याने समाजशिक्षक होत हे प्रश्‍न (घरीदारी जात?) का सोडवयाचे नाही हो? आम्ही हे करतोय म्हणून हे बोलणं लिहिणं!

चंद्रकांत भंडारी,
जळगाव 9890476538