माझ्या विधानाचा गैरअर्थ काढला जातो आहे; पाक परराष्ट्रमंत्र्याकडून सफाईची प्रयत्न

0

इस्लामाबाद- मागील आठवड्यात भारत पाकिस्तान दरम्यान सुरु करण्यात आलेल्या करतारपुर कॉरिडोअरच्या उद्घाटन कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमात पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री शाह महमूद कुरैशी यांनी भारताबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. भारतासाठी हा कार्यक्रम गुगली असल्याचे विधान त्यांनी केले होते. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. दरम्यान विरोध होत असल्याने कुरैशी यांनी आपल्या विधानाबाबत सफाई देण्याचा प्रयत्न करत बचाव केला आहे.

माझ्या विधानाचा चुकीचा अर्थ काढला गेला असे कुरैशी यांनी सांगितले आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहारमंत्री सुषमा स्वराज यांनी या विधानावरून पाकिस्तानचा खरा चेहरा जगासमोर आला असे प्रत्युत्तर दिले होते. सुषमा स्वराज यांनी याबाबत ट्वीट केले होते.

संबंधित बातमी-कुरैशी यांच्या बोलण्यावरून पाकिस्तानचा खरा चेहरा समोर आला-सुषमा स्वराज 

Copy