माझ्यासोबत भाजपचे १०-१२ आमदार, पण…: खडसेंचा गौप्यस्फोट

0

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी काल भाजपला रामराम ठोकला आहे. उद्या शुक्रवारी २३ रोजी ते राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. त्याच्या सोबत भाजपचे किती आमदार आणि खासदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. यावर एकनाथराव खडसे यांनी भाष्य केले आहे. ‘माझ्या सोबत भाजपचे १०-१२ विद्यमान आमदार आणि १५-१६   माजी आमदार आहेत. मात्र पक्षांतर बंदी कायदा असल्याने आणि सध्या फेरनिवडणुका घेणे देखील शक्य नाही. त्यामुळे विद्यमान आमदार सध्या तरी राष्ट्रवादीत प्रवेश करणार नाहीत. काही माजी आमदार आहेत ते उद्या माझ्यासोबत राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत असे एकनाथराव खडसे यांनी सांगितले आहे. आज गुरुवारी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते.

अनेक नगराध्यक्ष, पूर्ण नगरपालिका, नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, राज्यातील अनेक जिल्हा बँकांचे अध्यक्ष, सहकारी संस्थेचे अनेक संचालक माझ्यासोबत राष्ट्रवादीत येणार आहेत. ज्यांना पक्षांतर बंदी लागू नाही ते उद्याच प्रवेश करतील असेही खडसे यांनी सांगितले आहे.

Copy