माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जींच्या प्रकृतीत सुधारणा नाहीच

0

नवी दिल्ली: देशाचे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्यावर मेंदूशी संबंधित शस्त्रक्रिया झाली आहे. त्यातच त्यांना कोरोनाची देखील लागण झाली आहे. मेंदूशी संबंधित तपासणी करण्यासाठी गेले असता त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ती पॉझिटिव्ह आली. त्यानंतर त्यांच्यावर दिल्लीतील आर्मी रुग्णालयात उपचार सुरु आहे. मात्र त्यांच्या प्रकृतीत कोणतीही सुधारणा झालेली नसून अद्यापही त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.

त्यांची प्रकृती सुधारावी यासाठी डॉक्टरांचे प्रयत्न सुरु आहेत. मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने चिंता वाढली आहे.