माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचे निधन

0

पुणे: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील-निलंगेकर यांचं आज सकाळी पुण्यात उपचारादरम्यान निधन झाले. आज पहाटे किडणीच्या आजारानं ते ९१ वर्षांचे होते. त्यांच्यावर पुणे येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. काही दिवसांपूर्वी त्यांना करोनाची लागण झाली होती. मात्र त्यातून ते बरे झाले होते. किडनीच्या आजाराने ग्रस्त होते. १९८५ ते ८६ या कालावधीत त्यांनी राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवले होते. तसेच राज्याच्या मंत्रिमंडळात त्यांनी अनेक खात्यांचा कार्यभारही सांभाळला होता. भाजप नेते माजी मंत्री संभाजी पाटील निलंगेकर हे त्यांचे नातू आहेत.

शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचाजन्म ९ फेब्रुवारी १९३१ रोजी नणंद येथे झाला. त्याचं शालेय शिक्षण गुलबर्गा येथे आणि महाविद्यालयीन शिक्षण हैद्राबाद व पिछाडी पर्यंत नागपूरात झाले. १९६२ पासून त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरूवात झाली. कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, राज्याचे मुख्यमंत्री अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी आपल्या राजकीय कारकीर्दीत पार पाडल्या.