माजी महापौरांच्या प्रभागातील नागरिक अस्वच्छतेने त्रस्त

0

प्रभाग क्रमांक पाचमध्ये ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग; रस्ते दुरुस्तीच्या कामाला सुरुवात

जळगाव: माजी महापौरांचा प्रभाग असलेल्या क्रमांक 5 मध्ये साफसफाई होत नसल्याने येथील नागरिकांनी मनपा प्रशासनाच्या कार्यपध्दतीवर संताप व्यक्त केला. सफाईसाठी एकमुस्त ठेका देवूनही नियमितपणे साफसफाई केली जात नाही. त्यामुळे ठिकठिकाणी कचर्‍याचे ढिग दिसून आले. रिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. प्रशासनाने साफसफाईवर लक्ष केंद्रीत करुन साथरोगावर नियंत्रण ठेवावे अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. मनपा ईमारतीच्या मागील जागा स्वच्छ करु शकत नाही तर या प्रभागातील अन्य परिसरात काय सफाई करतील असा सवाल उपस्थित होत आहे. दरम्यान,शाहूनगरातील काही भागात तसेच बी.जे.मार्केट ,दिक्षीतवाडी परिसरात घाणीचे साम्राज्य आहे. या प्रभागातील सर्व नगरसेवक शिवसेनेचे आहेत. मनपात आता भाजपची सत्ता आहे. त्यामुळे मुद्दामहून या प्रभागाकडे दुर्लक्ष होत आहे की काय?असा सवालही उपस्थित केला जात आहे. मात्र रस्स्याच्या दुरुस्तीचे काम गुरुवारपासून सुरु झाले असून प्रभाग क्र.5 मधूनच सुरुवात करण्यात आले हे मात्र विशेष आहे.

सफाई होत नसल्याने दुर्गंधीचा सामना
प्रभाग क्रमांक 5 मध्ये बळीरामपेठ, भवानीपेठ, पोलनपेठ,नवीपेठ, जयकिसनवाडी,सिव्हिल हॉस्पीटल परिसर, दिक्षीतवाडी, वानखेडे सोसायटी, ओंकारनगर, गांधीनगर, साईबाबा मंदिर परिसर, खान्देश मिल सोसायटी, शाहूनगरचा काही भाग या परिसराचा समावेश आहे. या परिसरात पाहणी करुन प्रभागातील समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न केला. यावेळी प्रभागातील काही नागरिकांनी साफसफाई संदर्भात नाराजी व्यक्त केली.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या प्रभागात अशी भयानक अवस्था असेल तर अन्य प्रभागात काय समस्या असतील याचा विचारच न केलेला बरा असा खोचक प्रश्‍न नागरिक उपस्थित करु लागले आहेत. आर.एल.कॉलनीत गटारी आहेत. मात्र सफाई होत नसल्याने दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे.

शाहूनगरात सुविधांचा अभाव
प्रभाग 5 मधील पोलनपेठ, नवीपेठ, जयकिसनवाडी, ओंकारनगर, गांधीनगर या परिसरात सोयी-सुविधा पुरक आहेत.मात्र शाहूनगरात सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले. शाहूनगरात काही ठिकाणी गटारी दिसून आल्या तर काही ठिकाणी गटारी नसल्याने सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याचे चित्र दिसून आले.रस्त्याचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे.
काही ठिकाणी पथदिवे बंद आहेत. मनपा प्रशासन ज्या तुलनेत कर आकारणी करीत आहेत त्या तुलनेत सुविधा देण्यात कमी पडत असल्याचेही नागरिकांचे
म्हणणे आहे.

महापौरांच्या वार्डातील समस्यांची उपमहापौरांकडून पाहणी
गुरुवारी महापौर यांचा वार्ड असलेल्या प्रभाग क्रमांक 4 मध्ये उपमहापौर सुनिल खडके यांनी दौरा केला. रस्त्यावरील खड्डे, जलवाहिनीतून होणारी गळती, रस्त्यात पडलेले बांधकामाचे वेस्ट मटेरीयल, डासांचा उपद्रव आदी समस्या यावेळी आढळून आल्या. स्थायी समितीच्या माजी सभापती अ‍ॅड. शुचिता हाडा, महिला व बालकल्याण सभापती रंजना सपकाळे, पाणी पुरवठा सभापती अमित काळे, कैलास सोनवणे, स्वच्छता समिती सभापती चेतन सनकत, मिनाक्षी पाटील, गायत्री राणे, दिपमाला काळे, नगरसेवक मुकूंदा सोनवणे, चेतना चौधरी,शहर अभियंता अरविंद भोसले, पाणी पुरवठा अभियंता सुशिल साळुंखे, प्रभाग अधिकारी उदय पाटील, विद्युत विभाग प्रमुख एस एस पाटील, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, नगररचना सहाय्यक प्रसाद पुराणिक, शाखा अभियंता मंजूर खान, मनिष अमृतकर, मुख्य स्वच्छता निरिक्षक शरद बडगुजर, स्वच्छता निरिक्षक धिरज गोडाले, अमृत योजनेवरील मक्तेदाराचे अधिकारी प्रदीप पांढरे, गिरिश मोघे, नरेंद्र पाटील,उपस्थित होते.

Copy