माजी मंत्री खडसे म्हणाले, हा कसला धक्का : त्या, नगरसेवकांचा प्रलोभन देवून घडवला प्रवेश

मुक्ताईनगरातील भाजपात नऊ नगरसेवक माझेच खंदे समर्थक

मुक्ताईनगर : मुक्ताईनगरातील भाजपातून शिवसेनेत गेलेल्या नगरसेवकांचा पद टिकवण्याचे प्रलोभन देवून प्रवेश घडवण्यात आला असल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले. माजी मंत्री एकनाथराव खडसे म्हणाले की, हा मला धक्का वगैरे काहीच नाही. चार मुलांमुळे एक नगरसेविका आधीच अपात्र असून तिघांनी प्रवेश केला व त्यांच्यावरही अपात्र होण्याची टांगती तलवार आहे. अतिक्रमण, बनावट जातीचे दाखले दिल्या प्रकरणात जिल्हाधिकार्‍यांकडे 1 रोजी सुनावणी आहे. जिल्हाधिकार्‍यांनी अपात्र केले तरी आम्ही मंत्र्यांकडून ‘स्टे’ आणून आम्ही तुमचे नगरसेवक पद टिकवू, हे प्रलोभन दिल्याने संबंधितानी प्रवेश केला आहे. नऊ नगरसेवक भाजपात असलेतरी ते नाथाभाऊ समर्थकच आहे, असेही खडसे म्हणाले.