माजी मंत्री खडसेंसह भाजपाची बदनामी खटल्यात अंजली दमानियांचा अर्ज फेटाळला

0

मुक्ताईनगर न्यायालयाचा निकाल दमानियांसह प्रती शर्मा मेनन यांच्याविरोधात वॉरंट

भुसावळ- माजी महसूलमंत्री एकनाथरावजी खडसे यांच्यावर बेछूट व पुरावे नसताना आरोप करीत भारतीय जनता पक्षाची बदनामी केल्याप्रकरणी अंजली दमानिया यांच्याविरोधात भाजपा कार्यकर्ते रमेश ढोले यांनी मुक्ताईनगर न्यायालयात फौजदारी खटला दाखल केला होता. हा बदनामीचा खटला रद्द करण्यासाठी अंजली दमानिया यांनी मुक्ताईनगर न्यायालयात निशाणी 20 अर्ज केला होता. या अर्जावर 29 सप्टेंबर 2018 रोजी फिर्यादी रमेश ढोले यांच्यावतीने अ‍ॅड.ए.आर.कांडेलकर (मुक्ताईनगर) तर दमानियांच्या बाजुने अ‍ॅड.खैरनार यांनी युक्तिवाद केल्यानंतर शुक्रवार, 12 रोजी मुक्ताईनगर न्यायालयात या खटल्याची सुनावणी होवून दमानिया यांचा अर्ज न्यायालयाने फेटाळला. दरम्यान, दमानिया यांच्यासह प्रीती शर्मा मेनन हे मुक्ताईनगर न्यायालयात वारंवार गैरहजर राहिल्यामुळे त्यांच्याविरुध्द 30 हजार रुपयांचा बेलेबल वॉरंट जारी करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.

Copy