Private Advt

माजी मंत्री एकनाथराव खडसेंनी विधान परीषद निवडणुकीसाठी भरला अर्ज

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी महसुल मंत्री एकनाथराव खडसे यांनी गुरुवारी विधान परीषद निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, राष्ट्रवादी नेते खडसे यांना विधान परीषदेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर खान्देशातील कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारला आहे. सोशल मिडीयातून त्याबाबतचे मेसेज व्हायरल होताना दिसून येत आहेत.

विविध पदाधिकार्‍यांची उपस्थिती
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील, गृहमंत्री दिलीप वळसे, अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे, माजी प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, ओबीसी सेलचे प्रदेश उपाध्यक्ष उमेश नेमाडे, महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणी खडसे-खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.