माजी बॉक्सर डिंगको सिंगच्या मदतीला गंभीर

0

नवी दिल्ली : १९९८ सालच्या आशियाई स्पर्धेत सुवर्णपदकाची कमाई केलेल्या माजी बॉक्सर डिंगको सिंगच्या मदतीसाठी भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीरने मदतीचा हात पुढे केला. डिंगको एका गंभीर आजाराचा सामना करत असून त्याचे यकृत ७० टक्के निकामी झाले आहे. आर्थिक चणचण असलेल्या डिंगको सिंगला सध्या केमोथेरपीसाठीचा खर्च परवड नाही. डिंगकोबद्दलची बातमी कळताच गंभीरने क्षणाचाही विलंब न करत त्याच्याशी संपर्क साधून मदतीचा हात पुढे केला. गंभीरने घेतलेला पुढाकार नक्कीच कौतुकास्पद आहे.

डिंगकोने आजवर उपचारासाठी लाखो रुपये खर्च केले. पुढील उपचारासाठी खिसा रिकामा झाल्याने त्याने आपली मालमत्ता विकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली होती. याबद्दलची माहिती मिळताच गंभीरने डिंगकोला मदतीसाठीचा हात पुढे केला. बॉक्सर विजेंद्र सिंग याला याबद्दलची माहिती मिळाल्यानंतर त्याला धक्काच बसला. तो म्हणाला की, मी कालच रात्री भारतात आलो आणि डिंगकोबद्दलची माहिती मिळाली आणि मला धक्काच बसला. डिंगको माझा हिरो असून त्याच्याकडे पाहूनच मी बॉक्सिंग शिकलो. केंद्रीय क्रीडामंत्री विजय गोयल यांनीही याची माहिती मिळताच डिंगको हवी ती मदत करण्याचे आश्वासन दिले आहे.