माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा वाढदिवस उत्साहात

0

नवी सांगवी : पिंपळे गुरव येथील उद्योजक व माजी नगरसेवक शंकर जगताप यांचा वाढदिवस बुधवारी (दि. 5) विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. नवी सांगवी येथील पीडब्ल्यूडी मैदानावर आमदार लक्ष्मण जगताप स्पोर्ट्स क्लब, शंकर जगताप मित्र परिवार व सूर्यनमस्कार ग्रुपतर्फे लॉन टेनिस स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे उद्घाटन नगरसेवक अंबरनाथ कांबळे, नगरसेवक हर्षल ढोरे, सागर आंगोळकर यांच्या हस्ते झाले. या स्पर्धेत पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील 64 संघांनी सहभाग घेतला. रोहित बिदरी व प्रदीप गुप्ता यांनी या स्पर्धेत बाजी मारली. बक्षीस वितरण समारंभास नगरसेवक शशिकांत कदम, नगरसेवक संतोष कांबळे, नगरसेविका उषा मुंढे, भाजप सांगवी काळेवाडी मंडल अध्यक्ष अरूण पवार, माऊली जगताप, माजी जिल्हा न्यायाधीश रोहिदास गायकवाड, टेनिस प्रशिक्षक युवराज कोळेकर, प्रदीप पुजारी, अरविंद ढोरे, सुरेश झांझोटे आदी उपस्थित होते.

आरोग्य शिबिरास प्रतिसाद
पिंपळे गुरव येथे नगरसेवक शशिकांत कदम मित्र परिवार व श्री छत्रपती शिवाजी मित्र मंडळातर्फे आरोग्य चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले. या आरोग्य शिबिरात रुग्णांची रक्तगट तपासणी, नेत्रचिकित्सा करून मोफत चष्मे वाटप करण्यात आले. मराठवाडा जनविकास संघातर्फे शंकर जगताप यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून रस्त्यालगतच्या वृक्षांना मोफत पाण्याचे टँकर उपलब्ध करून देण्यात आले. तसेच बालसंस्कार केंद्रातील गरजू विद्यार्थ्यांना कपडे वाटप करण्यात आले. पिंपळे गुरव येथे नगरसेवक सागर आंघोळकर व युवा उद्योजक माऊली जगताप यांच्या संयोजनातून वाहनांची मोफत पीयूसी चाचणी करण्यात आली.