माजी खासदार भाजपचे जिल्हाध्यक्ष हरिभाऊ जावळे यांचे निधन

0

जळगाव:रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तसेच रावेर विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तथा भाजपचे विद्यमान जिल्हा अध्यक्ष हरिभाऊ माधव जावळे यांचे आज निधन झाले. त्यांना कोरोनाची लागण झाली होती, त्यांच्यावर उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 60 वर्षाचे होते. दोन वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. त्यांच्या कुटुंबात आई, पत्नी एक मुलगी दोन मुले असा परिवार आहे.त्यांच्या आकस्मिक निधनाने भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारीमध्ये एकच शोककळा पसरली आहे. हरिभाऊ यांचे 3 जून रोजी कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट आला होता. त्यांना उपचारासाठी मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे दाखल करण्यात आले होते .

त्यांनी मधुकर सहकारी साखर कारखाना न्हावी तालुका यावलचे चेअरमनपद देखील भूषवले आहे.

Copy