माजी खासदार निलेश राणेंविरुद्ध फैजपूरात गुन्हा

0

फैजपूर : माजी खासदार निलेश नारायण राणे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ‘हिजडा’ शब्दाचा अवमानकारक पद्धतीने उल्लेख करत तृतीयपंथीय समुदायाच्या भावना दुखविल्याने कलम 499 201 अन्वये अब्रु नुकसानीसह मानहानीचा गुन्हा फैजपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

तृतीयपंथीय समाजाच्या भावना दुखावणारा उल्लेख
गेल्या काही दिवसांपासून निलेश राणी व त्यांच्या विरोधी असलेले रोहित पवार व तनपुरे यांच्यात चालत असलेल्या सोशल मीडियावरील राजकीय वाक युद्धात निलेश राणे यांनी 19 मे 2019 रोजी सायंकाळी 07.39 च्या दरम्यान आपल्या ट्विटर अकाउंटवरून तृतीय पंथीय समुदायाचा उपहासात्मक पद्धतीने वापर करीत भावना दुखावणारी पोस्ट टाकली होती. दरम्यान, कुठल्याही लिंग, जाती धर्माचा उपरोधिक वा अवमानकारक त्याच्या अस्मितेला ठेच पोहोचविणे हा अपराध असल्याने निलेश नारायण राणे यांच्याविरुद्ध भारतीय दंड विधान इन्फॉर्मेशन अ‍ॅक्ट 499, 201 प्रमाणे तृतीयपंथी समाजाच्या प्रतिनिधी शमिभा पाटील यांच्या वतीने तक्रार दाखल करण्यात आली असल्याचे सूत्रांनी सांगितले.

Copy