माजी आ. चिमणराव पाटील यांना एबी फॉर्म घेण्यासाठी मुंबई बोलावले

0

जळगाव- शिवसेनेच्या विद्यमान आमदारांना उमेदवारीसाठी आज मातोश्री येथे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पक्षाचा अधिकृत एबी फॉर्म देण्यात आले.

यात जिल्ह्यातील शिवसेना नेते माजी आमदार यांना एबी न देण्यात आल्याने संभ्रम निर्माण करण्यात आला होता. मात्र माजी आमदार चिमणराव पाटील यांना उद्या दिनांक ३० रोजी मुंबई येथे उमेदवारीचा एबी फॉर्म घेण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहे. यासंदर्भात जिल्हा बॅंकेचे संचालक अमोल चिमणराव पाटील यांनी या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

दरम्यान या आदेशामुळे पारोळा-एरंडोल मतदारसंघात सुरू असलेल्या उलटसुलट चर्चाना पूर्णविराम मिळाला आहे.

Copy