Private Advt

माजी आमदार संतोष चौधरींना अटकेपासून दिलासा

भुसावळ सत्र न्यायालयाने जामीन फेटाळला : अर्नेषकुमार खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे आदेश

भुसावळ : भुसावळचे माजी आमदार संतोष चौधरी यांचा भुसावळ अतिरीक्त सत्र न्यायालयाचे न्या.संजय भन्साली यांनी गुरुवार, 1 जुलै रोजी जामीन फेटाळला मात्र अर्नेषकुमार व्हर्सेस बिहार खटल्याप्रमाणे पोलिसांना तपासाचे निर्देश देण्यात आल्याने चौधरींना अटकेपासून दिलासा मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले. भुसावळच्या मुख्याधिकार्‍यांना शिवीगाळ केल्याप्रकरणी चौधरी यांच्याविरोधात गुन्हा दाखल असून सत्र न्यायालयात आतापर्यंत 22 व 24 तसेच 30 जून रोजी जामिनावर युक्तीवाद करण्यात आल्यानंतर न्यायालयाने 1 रोजी निकाल जाहीर करणार असल्याचे सांगितल्याने निकालाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले होते.