गावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र

माजी आमदार रघुवंशी यांचा सनसनाटी आरोप

नंदुरबार – सीबीआय चौकशी, लाचलुचपत विभागाची चौकशी अशा अनेक चौकशांनी गावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र ठरले आहे, असा सणसणीत टोला माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भाजपच्या खासदार हिना गावित यांना लगावला आहे.
रेमडीसिविर इंजेक्शन वाटपात माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार हिना गावित यांनी केला होता. त्याला उत्तर देण्यासाठी माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषद घेऊन पुरावे सादर केले. ते म्हणाले की, कोरोना रुग्णांच्या परिस्थितीचे गांभीर्य ओळखून रोटरी वेलनेस सेंटर च्या माध्यमातून आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या मदतीने एक हजार इंजेक्शन मिळविले, ते गरजूंना शासन दरापेक्षा कमी किमतीत विकले. त्याची सर्व यादी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना सादर केली आहे. भाजपाचे खासदार सुभाष भामरे, सी.आर. पाटील यांनीही रुग्णांसाठी इंजेक्शन उपलब्ध करून दिले आहेत, मग नंदुरबारच्या खासदारांनी ते का केले नाही? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. पंधराशे रेमडीसीवर इंजेक्शन उपलब्ध करून दिल्याचा दावा खा. हिना गावित यांनी केला आहे. त्यावर बोलताना रघुवंशी म्हणाले की, ते इंजेक्शन कोणाच्या नावाने खरेदी केले? कोणत्या रुग्णालयांना पुरविले? याचा खुलासा खासदार हिना गावित यांनी करावा असे खुले आव्हान माजी आमदार रघुवंशी यांनी केले आहे. रेमडीसीवीर इंजेक्शन वाटपात आम्ही भ्रष्टाचार केल्याचा आरोप खासदार हिना गावित यांनी केला होता, त्याला प्रत्युत्तर देताना माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी म्हणाले की, दुसऱ्यावर आरोप करण्याआधी स्वतःचे घर काचेचे आहे,हे लक्षात ठेवावे. सीबीआय चौकशी,लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची चौकशी आदी विविध चौकशीने गावित परिवार भ्रष्टाचाराचे केंद्र ठरले आहे, हे साऱ्यांना माहीत आहे, खा,हिना गावित यांनी खासदार होण्याआधी विविध आरोग्य शिबिरे घेण्याचा धडाका लावला होता, मग आता अशा परिस्थितीत का बंद केला , त्या स्वतः डॉक्टर आहेत,त्यांची बहीण देखील डॉक्टर आहे,या दोघांनी कोविड सेंटरला योगदान देने अपेक्षित होते, मात्र ते होणार नाही, जिल्हाधिकारी राजेंद्र भारुड आणि खा. हिना गावित यांचे चांगले जमायचं मग आता त्यांच्यात का फाटले, हा देखील संशोधनाचा विषय आहे. खा गावित या नेहमी जिल्हा धिकाऱ्यांवर बेछूट आरोप करीत आहेत, राजकारण करण्यापेक्षा आणि रेमडीसीवर वर काढण्यापेक्षा कोरोनवर लढू या असे माजी आमदार रघुवंशी म्हणाले