माजी आमदार कृषीभूषण साहेबराव पाटील यांची भाजपाला सोडचिठ्ठी

0

अमळनेर : उत्तर महाराष्ट्रातुन माजी मंत्री एकनाथराव खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अनेक पक्षांच्या कार्यकर्त्यांची ग्रँड एन्ट्रीला राष्ट्रवादीत झाली. त्याच काळात तालुक्यातून अनेक कार्यकर्त्यांनी देखील प्रवेश केला होता. मात्र काही वर्षांपूर्वी काही कारणांमुळे माजी आमदार कृषिभूषण साहेबराव पाटील हे भाजपात गेले होते. मात्र आज कृषिभूषण साहेबराव पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद पर्व १ च्या माध्यमातून जलसंपदा मंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यांच्यासह कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती अ‍ॅड. ब्रम्हे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यात प्रमुख म्हणजे भाजपाचेच जास्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

Copy