मागील वर्षाच्या तुलनेत जिल्ह्याची टक्केवारी वाढली; यंदा ८९.७२ टक्के

0

जळगाव: राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विभागातर्फे घेण्यात आलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज जाहीर झाला. राज्याचा निकाल ९० टक्के इतका लागला आहे. नाशिक विभागात ९१.११ टक्क्यांनी धुळे जिल्हा अव्वल आहे. जळगाव जिल्ह्याचा ८९.७२ टक्के निकाल लागला आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा जिल्ह्याची टक्केवारी ४.७७ टक्क्याने वाढली आहे.जळगाव जिल्ह्यात एकुण ४६ हजार ९६४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यापैकी ४२ हजार १३७ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. एकुण निकालात जिल्ह्यात ९२.९१ टक्के मिळवून मुलींनी बाजी मारली असून मुलांनी ८७.४५ टक्के गुण मिळविले आहे. जिल्ह्याचा ८९.७२ टक्के निकाल लागला असून यात कला शाखा ८१.५३, वाणिज्य शाखा ९३.१८, विज्ञान शाखेचा ९६.९५ टक्के तर किमान कौशल्य शाखेचा ८५.६२ टक्के असा एकुण ८९.७२ टक्के आहे.

तालुकानिहाय निकाल
तालुकानिहाय टक्केवारीत अमळनेर तालुक्याने बाजी मारली असून त्यांचा निकाल ९३.६० टक्के आहे. सर्वात कमी एरंडोल तालुक्याने ८२.०३ टक्के मिळविले आहे. भुसावळ- ९२.७१ टक्के , बोदवड- ८७.४८ टक्के , भडगाव- ८२.८९ टक्के , चाळीसगाव- ८६.९७ टक्के , चोपडा-९१.०७ टक्के , धरणगाव – ९२.२५ टक्के , एरंडोल- ८२.०३ टक्के , जळगाव ८८.६४ टक्के , जामनेर-८८.०८ टक्के , मुक्ताईनगर- ९२.७३ टक्के , पारोळा-९१.५८ टक्के , पाचोरा- ९१.१२ टक्के , रावेर- ९१.४४ टक्के , यावल- ९०.३० टक्के , जळगाव शहर – ८८.०३ टक्के निकाल लागला आहे.

Copy