महोत्सवाच्या माध्यमातून मुलांना कलागुण सादर करण्याची संधी

0

धुळे । प्र त्येकाच्या अंगी कलागुण असतात. या महोत्सवाच्या माध्यमातून मुलांना आपल्या अंगी असलेले कलागुण सादर करण्याची संधी मिळाली आहे. जिल्हास्तरीय बाल महोत्सवाचा उपक्रम कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी येथे केले जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, कार्यालय, धुळे यांच्यातर्फे जिल्हास्तरीय चाचा नेहरू बाल महोत्सव 2016- 2017 चे आयोजन जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. बालकांच्या सर्वांगीण विकास व विविध गुणदर्शनाच्या उद्देशाने या बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शासनातर्फे विविध उपक्रम
जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे म्हणाले, विद्यार्थ्यांमधील सुप्त गुणांना वाव मिळावा म्हणून शासनातर्फे विविध उपक्रम राबविले जातात. त्याचाच एक भाग म्हणजे हा महोत्सव होय. अंगी असलेले कलागुण सादर करण्याची संधी विद्यार्थ्यांना या महोत्सवाच्या माध्यमातून मिळाली आहे. त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा. जिल्हा पोलिस अधीक्षक श्री. चैतन्या म्हणाले, अभ्यासाबरोबरच खेळ व इतर कलागुणांसाठी वेळ दिला पाहिजे. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. सोनगत यांनी प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या, अनाथ, निराधार, निराश्रीत बालकांकरीता चालविण्यात येणार्‍या बालगृहातील बालकांचा सर्वांगीण विकास तसेच त्यांच्यातील सुप्त गुणांना वाव देण्यासाठी चाचा नेहरू बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

ज्यूदो, कराटेचे प्रात्यक्षिक
या महोत्सवात ज्यूदो, कराटेचे प्रात्यक्षिक, जादूचे प्रयोग दाखविण्यात आले. तसेच बुध्दीबळ, चित्रकला स्पर्धा झाली. जी. ए. जाधव, श्रीमती एस. डी. परदेशी, यू. एस. सैंदाणे, ए. व्ही. पाटील, डी. एन. ताडगे, वसंत पाटील, विजय राजपूत, रत्ना वानखेडकर, जितेंद्र चौधरी, संदीप मोरे, देवेंद्र पाटील, राकेश नेरकर, योगेश जाधव, चंद्रकिरण शिसोदे, सतीश चव्हाण, सुनील वाघ, चंद्रकांत मोरे, मयूर वाघ, संदीप पाटील, चंद्रकांत सोनवणे, एच. एच. भट, दीपक सोनवणे, धनंजय जोशी, छबू पवार, हरीश जगताप, किसन पावरा, भारती पाटील आदींनी या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

अधिकार्‍यांची उपस्थिती
महोत्सवाचा उदघाटन समारंभ मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी डॉ. पांढरपट्टे यांच्या हस्ते झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पोलिस अधीक्षक चैतन्या एस., बालविकास प्रकल्प अधिकारी सुरेखा पाटील, बाल न्याय मंडळ सदस्य ड. डी. एन. महाजन, बालकल्याण समितीच्या सदस्या प्रा. उषा साळुंके, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी डॉ. वनिता सोनगत, जिल्हा क्रीडाधिकारी रवींद्र नाईक, परविक्षा अधिकारी एम. एम. बागूल उपस्थित होते.