महेलखेडीमध्ये केळीचे 150 घड कापून फेकले, 75 हजारांचे नुकसान

0

यावल- तालुक्यातील महेलखेडी येथे दोन माथेफिरुंनी एका बागेतील केळीचे घड कापून फेकल्याची घटना मंगळवारी सकाळी उघडकीस आली. त्यात शेतकर्‍याचे सुमारे 75 हजार रुपयांचे नुकसान झाले. याप्रकरणी दोघांविरुद्ध यावल पोेलिसात गुन्हा दाखल झाला. शेतकरी नितीन युवराज पाटील यांनी शेतात (गट क्रमांक 58/1) केळी लावली असून ती परीपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. मंगळवारी सकाळी शेतातील 150 झाडावरील केळीचे घड कापून आजूबाजूला फेकल्याचे दिसले. हे कृत्य महेलखेडी गावातील रशीद पटेल व त्यांचा मुलगा समीर पटेल यांनी केल्याचा पाटील यांना संशय या पिता-पुत्राने केळीचे घड कापल्याची तक्रार पाटील यांनी यावल पोलिसात दिली. तपास हवालदार सिकंदर तडवी करत आहे.

Copy