Private Advt

महिलेसह मुलाला बेदम मारहाण : सहा आरोपींना अटक

जळगाव : शहरातील रामेश्वर कॉलनी राहणार्‍या महिलेसह तिच्या दोन्ही मुलांना किरकोळ कारणावरून सहा जणांनी शिविगाळ करीत मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर सहा आरोपींना अटक करण्यात आली.

सहा संशयीतांविरोधात गुन्हा
अंजनाबाई नारायण पाटील (रा.स्वामी समर्थ चौक, रामेश्वर कॉलनी) या दोन मुलांसह वास्तव्याला आहे. मंगळवार, 24 मे रोजी सकाळी 9.30 वाजेच्या सुमारास त्यांच्या घराजवळ सुरज कुमावत (पुर्ण नाव माहित नाही) याने अंडा-बिर्याणीचे दुकान लावले व दुकानावर हिरव्या रंगाचे नेट लावले. अज्ञात व्यक्तीने नेट फाडून नुकसान केल्याने हिरवा नेट हे अंजनाबाई यांची मुले यशवंत पाटील आणि हेमंत पाटील यांनी फाडून नुकसान केले या संशयावरून सुरज कुमावत, मनोज निंबाळकर, आबा केने, धीरज केने, केतन सोनवणे आणि निलेश निंबाळकर (सर्वांचे पुर्ण नाव माहित नाही, रा.रामेश्वर कॉलनी, जळगाव) यांनी अंजनाबाई पाटील व त्यांची मुले यशवंत पाटील आणि हेमंत पाटील यांना शिवीगाळ करून मारहाण केली तसेच जीवे ठार मारण्याची धमकी दिली. याप्रकरणी अंजनाबाई पाटील यांनी एमआयडीसी पोलिसात धाव घेवून तक्रार दिल्यानंतर संशयीत आरोपी सुरज कुमावत, मनोज निंबाळकर, आबा केने, धीरज केने, केतन सोनवणे आणि निलेश निंबाळकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक करण्यात आली. पुढील तपास सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील करीत आहे.