महिलेला जबर मारहाण!

मेहूनबारे ता. चाळीसगाव: तालुक्यातील तामसवाडी शिवारातील शेतीच्या सामाईक बांध कोरल्याच्या कारणावरून एका महिलेस मारहाण करण्यात आली असून याप्रकरणी मेहूनबारे पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आले आहे.

                 सविस्तर वृत्त असे की, ज्ञानेश्वर हिलाल पाटील (रा. तामसवाडी ता. चाळीसगाव) येथे आपल्या परिवारासह वास्तव्यास आहेत. शेती हा व्यवसाय असल्याने तामसवाडी शिवारात त्यांच्या मालकीची जमीन आहे. मात्र शुक्रवार, २८ रोजी शेतीचा सामाईक बांध कोरल्यावरून पत्नी उषा ज्ञानेश्वर पाटील (वय- ३८) हिला अरूण अर्जून निकम व भुषण अरूण निकम या दोघांनी काठीने मारहाण करून उजव्या हातावर व मंण्गटावर दुखापत पोहोचली. हि घटना दुपारी १२:३० वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान पती ज्ञानेश्वर हिलाल पाटील व मुलगा अनिल ज्ञानेश्वर पाटील हे मध्यस्थी करायला गेले असता त्यांनीही मारहाण करण्यात आली. उषा ज्ञानेश्वर पाटील यांच्या फिर्यादीवरून कारभारी जामराव शिंदे, अरूण अर्जून निकम, कुसूमबाई अरूण निकम, भुषण अरूण निकम यांच्याविरुद्ध मेहूनबारे पोलिस स्थानकात भादवी कलम- ३२५, २९४, ३२३, ५०६ व ३४ अशा विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले आहे. पोलिस निरीक्षक पवन देसले यांच्या निर्देशानुसार पुढील तपास सुभाष पाटील हे करीत आहेत.