Private Advt

महिलेच्या गळ्यातून सोनसाखळी लांबवली : जळगावातील घटना

जळगाव : रात्रीच्या सुमारास फिरण्यासाठी निघालेल्या महिलेच्या गळ्यातील सोन्याची चैन अज्ञात चोरट्यांनी धूम स्टाईल लांबवली. ही घटना जळगासव शहरातील व्यंकटेश मंदीराजवळ बुधवार, 13 रोजी रात्री घडली. गुरुवारी या प्रकरणी रामानंद नगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

धूम स्टाईल सोनसाखळी लंपास
कला नरेंद्र भंसाली (66, रा.बालाजी पार्क, व्यंकटेश मंदिराजवळ, जळगाव) या बुधवार, 13 एप्रिल रोजी रात्री 9 वाजेच्या सुमारास शतपावली करण्यासाठी निघाल्या असतानाच अज्ञात चोरट्यांने त्यांच्या जवळ गळ्यातील 35 हजार रुपये किंमतीची 12 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन लांबवली. महिलेने आरडाओरड केली मात्र तो पर्यंत चोरटा पसार झाला. याबाबत गुरुवार, 14 एप्रिल रोजी सकाळी रामानंदनगर पोलिस ठाण्यात चोरट्याविरोधात रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणी पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक शांताराम पाटील करीत आहेत.