महिलेचे मंगळसूत्र हिसकावले

0
पिंपरी : दुचाकीवर आलेल्या चोरट्यांनी पादचारी महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावले. ही घटना रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास घडली. विद्या अरुण शिनकर (वय 38, रा. वैभवनगर, पिंपरी) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्या आणि त्यांची जाऊ एकत्र मिळून जेवण करण्यासाठी जात होत्या. पिंपरीतील उज्जीवन फायनान्सच्या ऑफिससमोर दोघी आल्या असता दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सव्वाचार तोळे वजनाचे 1 लाख 27 हजार 500 रुपये किमतीचे मंगळसूत्र हिसकावून नेले. यावरून गुन्हा दाखल करण्यात आला असून पिंपरी पोलीस तपास करीत आहेत
Copy