Private Advt

महिलेचे अंघोळ करण्याचे फोटो काढून व्हायरलची धमकी देत मागितली खंडणी : तरुणाविरोधात गुन्हा

भुसावळ/चोपडा : महिला अंघोळ करीत असताना तिचे फोटो काढून ते सोशल मिडीयावर व्हायरलची धमकी देत 25 हजारांची मागणी करणार्‍या एका तरुणाविरोधात चोपडा शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नरडाणा येथे गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर तो चोपडा शहर पोलिस स्थानकात वर्ग करण्यात आला. दीपक नानाभाऊ बोरसे (25, रा.गव्हाणे, ता.शिंदखेडा, जि.धुळे) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या संशयीताचे नाव आहे.

फोटो व्हायरलची धमकी देत मागितली खंडणी
पीडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, 10 मार्च 2021 रोजीच्या पूर्वी पीडीता अंघोळ करीत असतांना संशयीत आरोपी दीपक बोरसे याने निर्वस्त्र अवस्थेतील फोटो काढले व आरोपी दीपकने पीडीतेच्या व्हॉट्सअ‍ॅप नंबरवर हे फोटो पाठवून व्हायरल करण्याची धमकी दिली तसेच वारंवार फोनकरून अश्लील शिवीगाळ करीत पीडीतेकडून 25 हजारांची मागणी केली. या प्रकाराविषयी पोलिसात तक्रार केली तर आत्महत्या करेल, अशी धमकीही दिली. याप्रकरणी अ‍ॅट्रॉसिटी, विनयभंगसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास चोपडा उपविभागीय पोलिस अधिकारी भास्करराव डेरे करीत आहेत.