महिलेचा विनयभंग, आरोपीला धरणगाव न्यायालयाने सुनावली एक वर्षाची शिक्षा

Rape of woman in Dharangaon taluk: Accused sentenced to one year धरणगाव : महिलेच्या घरात अनधिकृतरीत्या प्रवेश करीत तिचा विनयभंग करणार्‍या आरोपीस धरणगाव न्यायालयाने आज आरोपीला एका वर्षाची शिक्षा सुनावली. रवींद्र झिंगा चौधरी असे शिक्षा सुनावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

2018 मधील घटना
धरणगाव तालुक्यातील एका गावात 2018 मध्ये रात्री महिलेच्या घरात घुसून विनयभंग केला होता. या प्रकरणी रवींद्र चौधरीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुनावणीनंतर सर्व साक्षीदार आणि पुराव्यांच्या आधारावर धरणगाव न्यायालयाचे न्या.अविनाश ढोके यांनी आरोपी रवींद्र चौधरी यास विविध कलमान्वये शिक्षा सुनावली. त्यानुसार कलम 354 मध्ये एक वर्षाची शिक्षा आणि हजार रुपये दंड, दंड न भरल्यास एका महिन्याची साध्या कैदेची शिक्षा, 452 मध्ये एक वर्ष शिक्षा, हजार रुपये दंड, दंड न भरल्यास 1 महिना साधा कारावास आणि 506 मध्ये 500 रुपये दंड आणि दंड न भरल्यास 15 दिवसांच्या साध्या कारावासाची शिक्षा अधिकची भोगावी लागणार आहे. दरम्यान, आरोपीला सर्व शिक्षा एकत्र भोगायच्या आहेत. सरकार पक्षाकडून हटकर तर बचाव पक्षाकडून अ‍ॅड.सी.झेड. कट्यारे यांनी युक्तीवाद केला.