महिला स्वयंसिध्द झाल्याशिवाय अत्याचार थांबणार नाहीत

0

वरणगाव । देशामध्ये जोपर्यंत महिलांना समानतेची वागणूक दिली जाणार नाही, त्यांच्यावर होणारे विविध प्रकारचे आत्याचार, हुंडाबळी, छेडछाड, बलात्कार वेगवेगळ्या कारणांनी अत्याचार प्रतिबंध कायदा 2013 साली प्रभावीपणे जनजागृती करुन त्यांची योग्य अंमलबजावणी झाली तर हे अन्याय थांबतील आजच्या परिस्थितीत महिला स्वयंसिध्द झाल्याशिवाय त्याच्यांवर होणारे आत्याचार थांबणार नाहीत, असे प्रतिपादन पाचोरा महाविद्यालयाच्या प्रा. मंगला शिंदे संस्थेच्या शतक पूर्वी महोत्सव आयोजीत कार्यक्रमात बोलत होत्या.

यांची होती उपस्थिती
यावेळी पाचोरा महाविद्यालयाच्या प्रा. मंगला शिंदे, प्रा. वृशाली जोशी, प्रा. किरण पवार, संध्या निकम, प्रा. बी.जी. देशमुख, प्रा. ए.एन. चित्ते, प्रा. व्ही.ई. पाटील, प्रा. अनिल शिंदे आदी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून महाविद्यालयातर्फे मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

महिला अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी करावी
प्रा. मंगला शिंदे पुढे म्हणाले की, महिलांवर होणारे शोषण थांबणार नाही तोपर्यंत देशाचा खर्‍या अर्थाने आर्थिक व सामाजीक विकासाला महत्व असणार नाही. ज्या देशात महिलांना सन्मानाने वागवले जाते. तो देश लवकर प्रगती केल्याचे दिसते. या देशात महिला सुरक्षित नाहीत. अनेक कायदे असून सुध्दा रोजच्या बातम्या वर्तमानपत्रात मोठ्या प्रमाणात स्त्रियांवर होणार्‍या आत्याचाराच्या बातम्या येतात. हे कमी करण्यासाठी आता 2013 साली करण्यात आलेल्या महिला अत्याचार प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अमलबजावणी झाली तर महिलांवरील अत्याचार थांबतील, असे म्हणाल्या.

लौकिक वाढविण्याचे आवाहन
या कार्यक्रमाची प्रास्ताविका प्रा. किरण पवार यांनी केली. त्यांनी सांगितले की, या संस्थेने शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली असून आजपर्यंत हजारो विद्यार्थ्यांचे भवितव्य घडविले आहे. येथूनच विद्यार्थी शिक्षण घेऊन आज राज्यभरात तसेच देशात विविध क्षेत्रात उच्च पदावर कार्यरत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी या माजी विद्यार्थ्यांचा आदर्श समोर ठेऊन आपल्या महाविद्यालयाचे नावलौकीक वाढविण्यासाठी कसोशिने प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रा. बी.जी. देशमुख यांनी मानले. हा कार्यक्रम राज्यशास्त्र विभागाद्वारे आयोजीत करण्यात आला होता व मोठ्या प्रमाणात विद्यार्थी व विद्यार्थीनी उपस्थित होत्या. यशस्वीतेसाठी शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी परिश्रम घेतले.