महिला सक्षमीकरण वाढीसाठी काॅंग्रेस राबविणार ‘हम मे है इंदिरा’ अभियान

0

नागोठणे : महिलांनी कर्तृत्व सिद्ध करून स्वयंसिद्ध व्हावे, अन्यायाविरूध्द आक्रमक व्हावे यासाठी विविध कायदे असूनही अलिबाग सारख्या प्रगत तालुक्यामध्ये महिलांवर अत्याचार करून परत उजळमाथ्याने समाजामध्ये वावरणारे लोक पहाता महिला सक्षमीकरण केवळ कागदावर न रहाता प्रत्यक्षात अंमलात येण्यासाठी महाराष्ट् प्रदेश महिला काॅंग्रेस कमिटीतर्फे ‘हम मे है इंदिरा’ अभियान राबविणार येणार असून त्याची अंमलबजावण रायगड जिल्हयामध्ये आजपासून सुरू झाली असल्याची घोषणा रायगड जिल्हा महिला काॅग्रेसच्या अध्यक्षा अॅड.श्रध्दा ठाकूर यांनी अलिबाग येथे केली.

जागतीक महिला दिनानिमीत्त बॅ.ए.आर.अंतुले भवन येथे आयोजित कार्यक्रमामध्ये त्या बोलत होत्या. अन्याय झालेली महिलेवर पहिले तर तक्रार दाखल करू नये म्हणून दबाव येतो आणि तक्रार दाखल केल्यावर ती चुकीने दाखल झाली आहे असे सांगण्यासाठी दबाव येतो. ही परिस्थीती भयानक आहे. फक्त वर्षातुन एकदा महिला दिन कार्यक्रमामध्ये महिलांचे गुणगाण गावुन भागणार नाही, आपण महिलांनी वर्षातील प्रत्येक दिवशी आपल्या सहकारी महिलांच्या रक्षणाकडे लक्ष दिले पाहिजे. त्यासाठीच महिला काॅंग्रेसने ‘हम मे है इंदिरा’ अभियान राबविण्याचा संकल्प जाहीर केला आहे असे अॅड.ठाकूर यांनी यावेळी सांगिते. इंदिरा गांधी या भारतामधील प्रत्येक महिलेचे प्रेरणास्थान आहेत. 16 वर्षे निडरपणे त्यांनी पंतप्रधान म्हणून देशाचे नेतृत्व केले. त्यांची निडरताच आता आपण सर्व महिलांनी अंगीकारली पाहिजे असे प्रतिपादनही श्रध्दा ठाकूर यांनी यावेळी केले ‘हम मे है इंदिरा’ अभियानांतर्गत महिलांच्या तक्रारी दुर करण्यासोबतच माहिलांचा राजकीय क्षेत्रामधील वावर वाढविण्यावरही भर दिला जाणार आहे. याची सुरूवात म्हणजे आज बॅ.ए.आर.अंतुले भवन येथे झालेल्या कार्यक्रमामध्ये बहुतांश महिलांनी ज्यांनी यापुर्वी कधीही जाहीर कार्यक्रमामध्ये भाषण केले नव्हते अशा महिलांनी आज व्यासपिठावर येवून आपले विचार मांडले.

काॅंग्रेसच्या शहापूर जिल्हा परिषद मतदारसंघातील उमेदवार उज्वला वैभव पाटील यांच्या ओघवत्या भाषणाने उपस्थित महिलांची मने जिंकली. उज्वला पाटील म्हणाल्या मी आमदारांच्या पत्नीविरूध्द निवडणूक लढविली, थोडक्या मताने पराभूत झाले. पराभुत झाले पण खचले नाही. ही निवडणूक आपल्या लोकशाहीचा आत्मा आहे. कोण तरी जिंकणार कोण तरी हरणार हे ठरलेले आहे. परंतु हरले म्हणून कोणावर राग नाही उलट काॅंग्रेस पक्षाची उमेदवार म्हणून लोकांनी भरभरून मते दिली यातच मला समाधान आहे.माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे हस्ते यावेळी निवडणूक जिंकलेल्या महिला उमेदवार मयुरी पाटील, ताई गडकर, निवडणूक लढविलेल्या उज्वला वैभव पाटील, श्रीमंती योगेश मगर, अमृता अमित नाईक, सुषमा भालचंद्र म्हात्रे, उनिता उमेश थळे, यांचा सत्कार करण्यांत आला.

यावेळी माजी आमदार मधुकर ठाकूर, जिल्हा उपाध्यक्ष भास्कर चव्हाण, तालुकाध्यक्ष अनंत गोंधळी, योगश मगर, अलिबाग मुरूड महिला विधानसभा अध्यक्षा मंदाताई बळी, मोनीका पाटील, तालुका महिला अध्यक्षा सुजाता प्रफुल्ल पाटील, माजी नगरसेविका आशाताई वारंगे, जयश्री म्हात्रे, सुजाता कोळी, नम्रता नरेश चव्हाण, माधुरी नरवणकर, कविता गिरीष पाटील, प्रणाली थळे,प्रभाकर राणे, सुर्यकांत पाटील, अॅड.कादंबरी काळे-पाटील, वर्षा धुरी, सुनीती पाटील, संध्या पाटील, इ.उपस्थित होते.