महिला व बालकल्याण सभापतीपदी प्रयाग कोळी

0

जळगाव। महिला व बालकल्याण सभापती निता राजेंद्र चव्हाण यांना जातवैधता प्रमाणपत्र अवैध ठरल्याने जिल्हा परिषद सदस्य पदावरुन अपात्र ठरविण्यात आले आहे. त्यांच्या अपात्रतेनंतर त्यांच्याकडे असलेले महिला व बालकल्याण विभागाचे सभापतीपद काढून घेण्यात आले. त्यानंतर सभापतीपद रिक्त होते. नाशिक विभागीय आयुक्ताच्या सुचनेनुसार जिल्हा परिषद अध्यक्ष प्रयाग कोळी यांच्याकडे सभापती पदाचा अतिरिक्त कार्यभार देण्यात आलेला आहे. नियुक्तीचे पत्र नुकतीच जिल्हा परिषद प्रशासनाला प्राप्त झाले आहे.