महिला, मुलींना पळविणाऱ्या या संशयितास आपण पाहिले आहे काय?

0

जळगाव : कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यासह जिल्हयात लॉकडाऊन आहे. कामधंदा नसल्याने अंसख्य परप्रांतीय गोरगरीब महिला, मुली, तसेच नागरिक पायीच गावाकडे जाताहेत.ही संधी हेरत त्यांच्या गावी सोडण्याचे अमिष दाखवून सराईत गुन्हेगार महिला तसेच मुलींना पळवून नेत आहेत. अशा सराईत गुन्हेगारावर जळगाव जिल्हा पोलीस दलातर्फे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.

गणेश सखाराम बांगर (३२) रा. मालेगाव वार्ड नं. ४ ता. मालेगाव जि. वाशिम असे संशयीताचे नाव आहे. त्याच्या उजव्या हाताच्या अंगठयावर मॉँ असे हिंदीत व पंजावर आई असे मराठीत तसेच डाव्या हाताच्या कामेवर इग्रजीत साथीया असे गोंदलेले आहे. त्याला टीक टॉक यूटयूबवर मोबाईल ॲपवर व्हिडीओ तयार करण्याचा छंद आहे.

सध्या राज्यातील मजूरांचे मोठया प्रमाणात स्थंलातर होत आहे. या परिस्थिीतीचा फायदा घेत रस्त्याने पायी जता असलेल्या मजुरांशी सहानुभूतीने संवाद साधत गणेश हा तुमच्या गावापर्यत पोहोचविण्यास मदत करतो, असे अमिष दाखवून महिला, मुलींना दुचाकीवर बसवून पळवून घेऊन जातो. तसेच हॉटेल,धाबा चालविण्यास घेतो, नोकरी लावुन देतो असे अमिष दाखवुन फसवणूक करतो. त्याच्याकडे दुचाकी चोरीची असून कारंजा ग्रामीण पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल असून दुचाकी क्रमांक एम.एच. ३७ वाय १८४७ असा आहे. सदर संशयीतांची माहिती देणाऱ्यास बक्षीस पोलिसांनी जाहीर केले असून त्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी भुसावळ, एलसीबी पोलीस निरीक्षक जळगाव तसेच सहायक पोलीस निरीक्षक नशिराबाद येथे देता येईल. दोन दिवसापूवी नशिराबाद भुसावळ दरम्यान एका मुलीस संशयीताने पळवून नेले होते. परंतु जळगाव पोलिसांनी नाकाबंदी करून तसेच पथके रवाना करून सदर मुलीचा शोध लावला होता.

Copy