महिला बालकल्याण सभापतींच्या पुढाकाराने अंगणवाडी सेविकांना चार हजार मास्कचे वाटप

0

जळगाव: कोरोना व्हायरसचे संक्रमण सुरू असताना यापासून बचाव करण्याचा प्रत्येकाचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागात अंगणवाडीच्या माध्यमातून बालकांना आहार देण्याचे काम करणारे अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांची सुरक्षा म्हणजे बालकांची सुरक्षा आहे. या दृष्टीने महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ज्योती राकेश पाटील यांनी पुढाकार घेत चार हजार मास्क तयार करून सेविकांसाठी सुपूर्द करण्यात आले. चोपडा तालुक्यातील महिला बचत गटाच्या महिलेंकडून मास्क तयार करून घेण्यात आले. सभापतींनी अंगणवाडी सेविकांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधला.

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लॉकडाउन पाडण्यात येत आहे. त्याचप्रमाणे बचावाच्या दृष्टीने वारंवार हात धुवा किंवा सॅनिटायझरचा वापर करणे आणि तोंडाला रूमाल किंवा मास्क लावण्याचे आवाहन करण्यात येत आहे. यामुळे कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी करता येणार आहे. अशात ग्रामीण भागात अंगणवाडीमधून बालकांना पोषण आहार दिला जात असतो. याठिकाणी काम करणाऱ्या अंगणवाडी सेविका आणि पर्यवेक्षिका यांची सुरक्षा देखील तितकीच महत्त्वाची आहे. या महिला कर्मचाऱ्यांची सुरक्षा म्हणून महिला व बालकल्याण समिती सभाती ज्योती राकेश पाटील यांनी अंगणवाडी सेविका व पर्यवेक्षिका यांच्यासाठी मास्क तयार करून दिले.

बचत गटांमार्फत काम

महिला व बालकल्याण समिती सभापती ज्योती पाटील यांनी चोपडा तालुक्‍यातील चार महिला बचत गटांकडून चार हजार मास्क तयार करून घेतले. थ्री लेअर असलेले वॉशेबल मास्क तयार करून घेतले असून, आज महिला व बालविकास अधिकारी आर. आर. तडवी यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले. यावेळी सभापती ज्योती पाटील, राकेश पाटील आदी उपस्थित होते. यासाठी तालुका अभियान व्यवस्थापक विजय पाटील, सतीष दहाड़, किशोर सोनवणे यांचे सहकार्य लाभले.

Copy