महिला बचत गटांचा गिरणाई महोत्सवाचे आयोजन

0

जळगाव । केंद्र शासन व राज्य शासन पुरस्कृत राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियांनातर्गत दारिद्ररेषेखालील महिला बचत गटाने उत्पादित केलेल्या वस्तुंचे प्रदर्शन व विक्री मेळाव्याचे चार दिवशीय गिरणाई मोहत्सवाचे आयोजन महानगर पालिकेतर्फे करण्यात आले आहे. शुक्रवार 24 ते सोमवार 27 पर्यंत आयोजन सागर पार्क येथे करण्यात असून सकाळी 10 ते रात्री 10 पर्यंत चालणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन जिल्हाधिकारी अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास यांची उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर नितीन लढ्ढा यांच्यासह स्थायी सभापती वर्षा खडके, महिला बालकल्याण समिती अध्यक्ष कांचन सोनवणे, नगरसेवक नरेंद्रआण्णा पाटील, आयुक्त जीवन सोनवणे, नगरसेविका अ‍ॅड. शुचिता हाडा, नगरसेविका लता मोरे, नगरसेविका उज्वला बेंडाळे, नगरसेवक संदेश भोईटे आदी उपस्थित होते.

बचत गटांचा सन्मान
शहरातील दारिद्र रेषेखालील असणार्‍या महिलांचा बचत गट तयार करण्यात आले असून महिला बचत गटांतील महिलांना स्वतःसह गटातील महिलांची प्रगती केली आहे. अशा प्रगती करणार्‍या गटांना गौरविण्यात आले. यावेळी महालक्ष्मी महिला बचत गट, हरिविठ्ठल नगरातील श्रद्धा महिला बचत गट, समता नगरातील गुरूकृपा महिला बचत गट व हरिविठ्ठल नगरातील निर्मलवस्ती संघ महिला बचतगटांचा गौरव केला.

महिला सक्षमीसाठी सहाय्य
आयुक्त जीवन सोनवणे यांनी प्रास्तविकात शहरातील महानगर पालिकेअंर्गत दारिद्र रेषेखालील 300 महिला बचत चांगले उत्पादन करीत असल्याचे सांगितले. दारिद्र रेषेखालील बचत गटांना प्रथमच मोहत्सवाद्वारे संधी देण्यात आली असल्याचे स्पष्ट केले. या महिला बचत गटांना कायम स्वरूपी विक्री केंद्र मिळावे या उद्देशाने गोलाणी मार्केट येथे विक्री केंद्र सुरू करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. या केंद्रावर महिला बचत गटांनी उत्पादित माल महिन्याच्या 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत विक्री करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी रूबल अग्रवाल यांनी उद्घाटनप्रसंगी महिलांनी सक्षम बनण्यासाठी महिला बचत गटांचे महत्व सांगितले.