महिला दिनी केले उपोषण!

0

जळगाव । जागतिक महिला दिनाच्या दिवशीच महिला ठेवीदाराचे जिल्हाआधिकारी कार्यालया समोर लाक्षणिक उपोषण लक्षवेधी ठरले. महिला ठेवीदार संघटनेच्या माध्यमातून 2007 पासून पाठपुरावा करत असताना आता पर्यत महिला ठेवीदारांना न्याय मिळत नसल्याने आक्रमकता महिला ठेवीदारान मध्ये दिसून आली . आपल्या कष्टाचे पैसे मिळत नसल्याचा ठाहो या वेळी महिला ठेवीदारांनी फोडला आहे. 12 वर्षा पासून या बाबत मंत्री मोहोदया पासून सगळ्यांनाच पाठपुरावा करण्यात आला आहे. मात्र आता पर्यत शासनाच्या वतीने कोणत्याही प्रकारची अंमल बजावणी अद्याप पर्यत झालेली नसल्याने महिला ठेवीदारांनी शासनाच्या झालेल्या वागणुकीचा निषेध महिला ठेवीदारांनी दिला आहे., जिल्हा अधिकारी,जिल्हा उपनिबंधक यांना निवेदन देण्यात आले.

संस्थांचा मनमानी कारभार
सहकार विभागाकडे आपल्याच रकमा परत मिळण्यासाठी पाठपुरावा करण्यात येत असुन फक्त कागदोपत्री 100 पैकी 10 अर्जांना निवेदना मधून उत्तर देण्यात येत आहे. पतसंस्थांमध्ये तर कोणतीच दखल घेण्यात येत नसून 80 टक्के संस्थांची कार्यालय बंद आहेत. बाकी संस्था दमदाटी करुन ठेवीदारांना वेठीस धरत असून मनमानी कारभार करीत प्रचंड वसुली होवून सुध्दा आदेश असलेल्या महिला ठेवीदारांना हक्काच्या ठेवी देण्यात येत नसून 10 वर्षापासून ठेवीदारांच्या पावत्यांवर कोणतेच व्यवहार संस्थांच्या मनमानी भूमिकेमुळे झाले नसुन कर्जदारांकडून प्रचंड प्रमाणात व्याजाची वसूली करणारे ठेवीदारांना मात्र व्याज न देण्याची भूमिका असल्याचा आरोप जिल्हा महिला ठेवीदार कृती समितीने केला आहे.

कृती समितीचा आंदोलन करण्याचा इशारा
जागतिक महिला दिनी महिला ठेवीदार कृती समितीने केलेल्या मागण्या संदर्भात तात्काळ आदेश मर्यादीत करण्यात यावे. 8 दिवसाच्या आत कारवाई करावी अन्यथा येत्या सोमवारी नाशिक व पुढील 8 दिवसांनी पुणे कार्यालयासमोर प्रचंड आंदोलन करणार असल्याचा इशारा महिला ठेवीदार कृती समितीने दिला आहे.

महिला ठेवीदाराचे आयुष्य उध्वस्त
अनेक दिवसा पासून ठेवीदार आपल्या मागण्या मांडत आहेत. मात्र अद्याप ठेवीदाराच्या ठेवीबाबत चे प्रकरण प्रलंबित असल्याचे महिला ठेविदारानी म्हटले आहे. जागतिक महिला दिनी पतसंस्था चालकांनी ठेवीदारांचे आयुष्य उध्वस्त केले आहे. त्या मध्ये सर्वार्धिक मुक्सन हे महिला ठेवीदारांचे झाले आहे. ठेवीदारान मध्ये महिलाची संख्या जास्त असून संसाराचे ओझे उचलताना सर्वात जास्त झळ ही महिलांना बसली असून गेल्या 12 वर्षा पासून ठेवी परत करण्याच्या संदर्भात पाठपुरावा करत असल्याचे महिला कृती समितीच्या निवेदनात म्हटले आहे.