महिला दिनाच्या पूर्वसंध्येला बोहर्डीत विवाहितेचा विनयभंग

0

वरणगाव । येथून जवळच असलेल्या बोहर्डी बुद्रूक येथील घरपट्ठी पाणीपट्टीची वसुली मागणार्‍या ग्रामसेवकाने वसुलीचा तगादा लावून महिलेचा विनयभंग केल्याची घटना मंगळवार 7 रोजी जागतीक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला घडल्याने वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे गावात एकच खळबळ उडाली आहे.

वरणगाव पोलीसात गुन्हा दाखल
बोहर्डी बुद्रूक येथील ग्रामसेवक काशिनाथ आत्माराम भंगाळे हे मंगळवार 7 रोजी सकाळी 9 वाजेच्या दरम्यान गावात घरपट्टी पाणीपट्टी वसुली करीत असतांना पिडीत महिलेल्या घरासमोर सार्वजनीक जागेत वसुलीचा तगादा लावत तुम्ही फुकटचे पाणी पितात का? यावरून या दोघामध्ये शाब्दीक वादात माहिलेच्या साडीचा पदर ओढला व लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन शिवीगाळ केली. म्हणून ग्रामसेवक काशीनाथ आत्माराम भंगाळे यांच्या विरूध्द वरणगाव पोलिसात पिडीत महिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास पीएसआय निलेश वाघ, पोलिस हेडकॉन्स्टेबल रविंद्र बोंडे करीत आहे.