महिला टी-20 चॅलेंज स्पर्धा: हरमनप्रीत कौर, मंधाना, मिताली राजकडे नेतृत्व

0

मुंबई: यूएई (संयुक्त अरब अमिराती)मध्ये ४ ते ९ नोव्हेंबर दरम्यान महिला टी-२० चॅलेंज स्पर्धा रंगणार आहे. यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी अनुक्रमे हरमनप्रीत कौर, स्मृती मंधाना आणि मिताली राज याची निवड करण्यात आली आहे. आज रविवारी ११ ऑक्टोंबर रोजी भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय)ने तिघांची कर्णधार म्हणून घोषणा केली आहे.

सुपरनोव्हाससाठी हरमनप्रीत कौर, ट्रेलब्लाझरसाठी स्मृती मंधाना आणि वेलोसिटीसाठी मिताली राजची निवड करण्यात आली आहे. दुबईतील ऐतिहासिक अशा शारजाह क्रिकेट स्टेडियममध्ये या स्पर्धा होणार आहे. इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, श्रीलंका, वेस्ट इंडिज, बांगलादेश आणि न्यूझीलंड संघामध्ये ही स्पर्धा रंगणार आहे.

Copy