महिलांसाठी 27 मार्च रोजी तालुकास्तरीय तक्रार निवारण

0

धुळे। तहसील कार्यालयात 27 मार्च रोजी सकाळी 11 वाजता तालुकासतरीय महिला दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिवशी समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्‍न मांडण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देण्यात येणार आहे. महिलांच्या हक्कांचे संरक्षण होवून त्यांना न्याय मिळावा यादृष्टीने त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

ज्या महिलांना तक्रार द्यावयाची असेल अशा महिलांनी 15 दिवस आगोदर सिंधु अर्पाटमेंट, नकाणे रोड, सिद्धेश्वर हॉस्पिटलजवळ देवपुर येथे अर्ज दाखल करावा असे आवाहन बालविकास प्रकल्प अधिकारी एल. बी. चव्हाण यांनी केले आहे.