महिलांसाठी भव्य सांधेदुखी तपासणी व उपचार शिबीर

0

चाळीसगाव ।महिलांसाठी भव्य सांधेदुखी मोफत तपासणी व अल्पदरात उपचार शिबीर बापजी जीवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, हिरापुर रोड येथे 10 मार्च 2017 रोजी महिलांसाठी आरोग्य शिबिराचे सुरूवात झाली. शिबिराच्या उद्घाटन प्रसंगी मंचावर जेसीआय चाळीसगांव सिटीचे अध्यक्ष बालाप्रसाद राणा सचिव जेसी अफसर खाटीक, डॉ. दीपक जाधव, डॉ.सुरेश सूर्यवंशी, जेसी गजानन मोरे उपस्थित होते. यावेळी बालाप्रसाद राणा यांनी सांगितले की, महिलांमध्ये सांधेदुखी आजाराचे प्रमाण जास्त प्रमाणात वाढलेला आहे. त्यांचे योग्य पद्धतीने निदान झाले पाहिजे. महिलांसाठी भव्य सांधेदुखी मोफत तपासणी व अल्पदरात उपचार शिबीराचे नियोजन करण्यात आले असून शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे

शिबीराचा लाभ घेण्याचे केले आवाहन
यात मान दुखी, पाठदुखी, कंबर दुखी, वजन वाढने यासारख्या आजाराने त्रस्त असलेल्या महिलांनी या शिबीराचा लाभ घ्यावा असे त्यानी आवाहन केले .डॉ दिपक जाधव यांनी फिजिओथेरेपी, कपिंग थेरेपी, हिज्माथेरेपी, रक्तमोक्षण, स्नेहन, लेझर थेरेपी या उपचार पध्दतीची माहीती दिली. जेसी धर्मराज खैरनार यांनी सूत्रसंचालन केले तर डॉ.संदिप देशमुख, अजय जोशी, जेसी विजय शिरसाठ यांनी शिबिर यशस्वी होण्यासाठी परिश्रम घेतलेत. शिबिरास फयाज शेख, विनायक ठाकरे, दिनेश चव्हाण, दिपाली राणा, जगदीश पटेल, एन.आर .पाटिल, विनायक ठाकरे उपस्थित होते. दोन दिवशीय या शिबीराचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजक बापजी जीवनदीप मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्याकडून करण्यात आले आहे.