महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी प्रयत्न करणार

0

एरंडोल । आडगाव पंचायत समितीच्या गणात एस.टी. महिला या प्रवर्गातून शिवसेनेच्या तिकिटावर उमेदवारी करत असून नांद्रखुर्द बुद्रुक येथील रहिवाशी आहे. माझे पती माझे पती भिका मोरे हे सुद्धा गेल्या 15 वर्षांपासून राजकारणात सक्रिय असून लोकसेवेचा आमचा मानस आहे.माझे पती सुद्धा माजी ग्रा.पं.सदस्य असून आम्ही कार्यरत असतांना गावातील पाणी प्रश्न कायम स्वरूपी सोडवला असून संपूर्ण गावाचे काँक्रीटकरण स्वच्छता अशी विविध कामे केली असल्याची माहिती आडगाव पंचायत समिती गणासाठी उभ्या असलेल्या शिवसेनेच्या उमेदवार सरस्वती भिका मोरे यांनी जनशक्तिशी बोलतांना सांगितले.

गणातील सर्व गावे हागणदरीमुक्त करतात
गणातील जनतेने मला निवडून दिल्यास मी संपूर्ण गणात गावांचा हागणदारीमुक्त करण्याचा प्रयत्न करेल मी महिला उमेदवार असल्याने ग्रामीण भागातील महिलांना बचत गटाच्या माध्यमातून स्वावलंबी करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न शील राहील महिलांचे प्रश्न सोडविण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल पं.स.च्या अंतर्गतच्या सर्व सुविधा जनमानसांपर्यंत पोहचवण्यासाठी सदैव प्रयत्न शील राहील. शिवसेनेने माझ्या वर दाखविलेल्या विश्वासाला व जनतेच्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही. सदैव विकास कामांसाठी प्रयत्नशील राहील.