महिलांच्या सत्कारासाठी सरसावल्या विविध संघटना

0

जळगाव । बुधवार 8 मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त महिला दिन जिल्ह्यात विविध उपक्रम राबवित साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील सामाजिक उपक्रमात सक्रिय भाग घेणार्‍या विविध संघटनांनी याला मोठा प्रतिसाद देला. आपला संसार सुखाने चालवत पुरूषांच्या खांद्याला खांद्या लावत बरोबरीने काम करत आपापल्या क्षेत्रात उल्लेखनिय काम करणार्‍या महिलांचा आदरपुर्वक सत्कार करण्यात आला. पाचोरा येथील गो.से.हायस्कुल येथे महिलांचा सत्कार, जामनेरात नायब तहसिलदार यांच्या उपस्थितीत महिलांना मार्गदर्शन केले. चाळीसगाव येथे सह्याद्री प्रतिष्ठानचे शहर संघटक पदाधिकारी यांनी महिला दिनी रक्तदात्याने वाचविले महिलेचे प्राण वाचविले, उमंग समाजशिल्पी महिला परिवारातर्फे महिला दिन साजरा करण्यात आला. चाळीसगाव तालुक्यातील जामडी येथे जागतिक महिला दिन व रयत सेनास्थापना दिना निमित्त आरोग्य शिबीर घेण्यात आले. पाचोरा तालुक्यातील सारोळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी पुढाकार घेत स्वच्छ भारत अभियानासाठी संकल्प केला.

पाचोरा येथे गो.से. हायस्कुलमध्ये महिलांचा झाला सत्कार
पाचोरा । शहरातील गो.से. हायस्कुल येथे जागतिक माहिलादिन साजरा करण्यात आला. यावेळी नगरसेवीका सुचीताताई वाघ, ज्योतीताई वाघ, कल्पना जगंम, प्रा.मंगला शिंदे, लालिता चौधरी, सुरेखा पाटील, सुवर्णा पाटील, सध्याताई बोरसे, सास्कृतिंक प्रमुख प्रमिला वाघ, पर्यवेक्षिका पी.पी. पाटील यांच्यासह सर्व शिक्षिका उपस्थीत होत्या. व त्याचा सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे प्रास्तविक संगीत शिक्षक सागर थोरात यांनी केले तर सुत्रसंचालन व आभार महेश कौडीण्यं यांनी मानले. प्रतिमा पुजन मान्यवरांनी केले. सी. एल.जाधव मॅडम, पी.पी. पाटील मॅडम, सी.बी. सुर्यवंशी यांनी माहिला दिनाची माहिती दिली. यावेळी मुख्याध्यापक एस.डी. पाटील, उपमुख्याध्यापक एल.एस.शिंपी, पर्यवेक्षक ए.जे.महाजन, पी.जे.पाटील, आर.एल. पाटील, कलाशिक्षक प्रमोद पाटील आदी उपस्थित होते.

सारोळा बुद्रुक महिलांची उल्लेखनिय कामगिरी
पाचोरा । तालुक्यातील तालुक्यातील सारोळा बुद्रुक येथे जागतीक महिला दिनानिमित्त पं.स.पाचोरा, स्वच्छ भारत अभियान अंतर्गत गावातील महिलांनी महिला दिनानिमित्त उल्लेखनीय कामगिरी केली. यामध्ये सारोळा ग्रामपंचायतचे माजी सरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांनी पुढाकार घेतला आणि आपल गाव हगणदारी मुक्त व्हावे म्हणून संपूर्ण गावातील घराघरात जाऊन संडासचे डबे जमा केले. हे डबे जमा करत असतांना गावातील प्रत्येक घरातील महिलेने या अभिनव उपक्रमात सहभाग घेतला व गावातील प्रचार रॅली मध्ये सहभाग घेतला. या अभिनव उपक्रमासाठी गावचे सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांच्यासह बीडीओ गणेश चौधरी, विस्तार अधिकार, सर्व तालुक्याचे ग्रामसेवक व स्वच्छ भारत अभियानाचे कर्मचारी आदिंची उपस्तिथी होती. या कार्यक्रमात गटविकास अधिकारी यांनी गावातील महिलांना व गावकर्यांना हागणदारी मुक्ती साठी संदेश दिला, संपूर्ण गावात स्वच्छता हवी असेल तर महिलांचा सहभाग गरजेचा आहे असे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमाच्या यशीस्वतेसाठी पं.स.कर्मचारी, तालुक्यातील ग्रामसेवक,सरपंच गावातील लोकांनी परिश्रम घेतले.

गरूड महाविद्यालयात महिला शिक्षिकांचा सन्मान
शेंदुर्णी । गरूड महाविद्यालयात बलसभेचे आयोजन करून शाळेतील सर्व महिला शिक्षक यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगिताने झाली. अध्यक्षस्थानी विद्यालयातील ज्येष्ठ शिक्षिा के.डी. पाटील यांनी भूषविले या दिनानिमित्त यशबाई विसपुते, माधव गायकवाड, मेधा नाथ, चैताली पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सूत्रसंचालन आकांक्षा बारी यांनी केले. या प्रसंगी उपमुख्याध्यापक एस.डी. चव्हाण व पर्यवेक्षक डी.आर. शिंपी यांनी सर्व शिक्षिका व एक विद्यार्थी प्रतिनिधी यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले व महिला दिवसाचा इतिहास व होणार्‍या त्रासाबद्दल माहिती दिली. श्रीमती के.डी. पाटील यांनी स्त्रीयांना योग्य सन्मान तो सन्मान दिला गेला पाहिजे. असे स्वरचित्र कवितेतून सांगितले. विद्यालयाचे उपशिक्षक जे.एम. नाईक व सेजल बोरकर यांनी महिला दिनानिमित्त कविता सादर केली. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व शिक्षक- शिक्षिका यांनी प्रयत्न केले. शिक्षिका एस.व्ही. पाटील यांनी मार्गदर्शन केले. आभार रिया सपकाळ यांनी मानले.

उमंग समाजशिल्पी महिला परिवार
उमंग समाज शिल्पी महिला परिवार आयोजित महिलांनी स्वावलंबी होऊन आर्थिक सुबत्ता साधन्याच्या दृष्टीने महिला दिनाच्या अनुषंगाने माझा पैसा माझ्या हाती वाढविण्याची नवी पद्धती कार्यक्रम व उमंगसृष्टी उद्योगिनी विकास केंद्र स्थापना तसेच पदग्रहण सोहळा अध्यक्ष पदाचा कार्यभार सुवर्णा राजपूत यांना सोपविण्यात आला तर सचिवचा कार्यभार निता चव्हाण यानी स्वीकारला. आदर्श सामाजिक कार्यक्रमाचे उदघाटन प्रमुख मार्गदर्शक कविता जाधव, आमदार उन्मेश पाटील, आशालता चव्हाण नगराध्यक्षा, मिनाश्री निकम पदग्रहण सोहळा व अद्यावत सामाजिक उपक्रमांचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते झाले. तसेच मोफत सर्व समावेशक वधू वर सूचक मंडळ (कोर टीम), गरजू विद्यार्थ्यांसाठी मोफत शिकवणी वर्ग (ललिता दत्तात्रय पिंगळे), मोफत आरोग्य तपासणी (डॉ.ज्योती पाटील) मोफत शिकवणी क्लास (मेनका जंगम), मोफत बालसंस्कार वर्ग (रत्नप्रभा नेरकर), मोफत रांगोळी व मेहंदी कला कौशल्य वर्ग (रेखा जोशी), मोफत संगणक व ब्युटीपार्लर प्रशिक्षण (साधना पाटील) या प्रत्येकीने आपापल्या मोफत उपक्रमांबद्दल माहिती सांगितली.संपदा पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. त्यात सांगितले की कोणता उद्योग करावा? निवड कशी करावी? जेजे मिळेल ते घेण्याचा व विकासाची कास धरून प्रयत्न करूया असे त्यांनी सांगितले, तर उद्योगिनी विकास केंद्राची स्थापना नाविन्यपूर्ण पद्धतीने करण्यात आली यात विविध आधुनिक स्त्रीरत्नांच्या वेशभूषेच्या माध्यमातून महिलांना प्रेरणा देण्याचे काम याप्रसंगी करण्यात आले.याप्रसंगी व्यक्तिमत्व विकास व्हवा याप्रसंगी उमंग महिला परिवार वर्षभरात हळदी कुंकू वाण वाटप, महाआरोग्य शिबिर, नारीशक्ती, वटपोर्णिमा, शासकीय योजनांची माहिती, संगणक ब्युटीपार्लर व फळ प्रक्रिया कार्यशाळा, शिक्षिका सन्मान सोहळा यासारखे उपक्रम राबवितो.

रक्तदात्याने वाचविले महिलेचे प्राण
चाळीसगाव । तालुक्यातील बेलगंगा येथील महिलेला तात्काळ दुर्मिळ अशा रक्तगटाची आवशकता असतांना सह्याद्री प्रतिष्ठानचे शहर संघटक हे मदतीला धावून गेले असून त्यांनी सदर महिलेला रक्तदान केल्याने महिलेच्या परिवाराने त्यांना धन्यवाद दिले आहे. ‘ओ’ निगेटिव्ह हा रक्तगट अत्यंत दुर्मिळ मानला जातो. लाखात 10 लोकांचा हा रक्तगट असल्याने बरयाचदा गरजू रुग्णाला या रक्तापासून वंचित राहावे लागते. तसेच हा रक्तगट कोणाचा आहे यासाठी मोठी शोधाशोध करावी लागते. चाळीसगाव तालुक्यात बोटावर मोजण्या इतके या रक्तगटाचे व्यक्ती आहेत. तालुक्यातील बेलगंगा येथील रहिवाशी पोलीस कर्मचारी समीर पाटील यांच्या भगिनी प्राजक्ता प्रशांत पाटील यांना तातडीने या रक्तगटाची गरज असल्याने त्यांच्या नातेवाईकांनी बराच शोध घेतल्यानंतर सह्याद्री प्रतिष्ठानचे चाळीसगाव शहर संघटक व महाराष्ट्र प्लम्बिंग असोसिएशन चे जळगाव जिल्हा सचिव रवींद्र सूर्यवंशी यांचा रक्त गट ओ निगेटिव्ह असल्याचे समजल्यानंतर त्यांनी लागलीच रवींद्र सूर्यवंशी यांचेशी संपर्क साधल्याने त्यांनी तात्काळ होकार देऊन ऐन महिला दिनी त्या महिला बघिणीला रक्तदान केल्याने महिलेने व परिवाराने त्यांना धन्यवाद दिले आहेत. याबाबत रवींद्र सूर्यवंशी यांचे शी संपर्क साधला असता ओ निगेटिव्ह रक्तगट हा अत्यंत दुर्मिळ आहे. लाखात दहा – बारा लोकांचा हा गट असू शकतो. त्यामुळे गरजू रुग्णाला फार शोधाशोध करावी लागते. मात्र बेलगंगा येथील एका भगिनीला या रक्तगटाची आवशकता होती आणि तो रक्तगट माझा असल्याने महिला दिनी एका भगिनीला रक्तदान केल्याचा मनस्वी आनंद होत असून कोना गरजू रुग्णास या रक्तगटाची गरज पडल्यास त्यांचे नातेवाईकांनी माझेशी संपर्क साधावा असे आवाहन त्यांनी केले आहे.

चाळीसगाव येथे विविध मागण्यांसाठी घरेलू कामगार महिलांचे धरणे
चाळीसगाव । घरेलू कामगार महिलांच्या मागण्यांसंदर्भात 2 वर्षांपासून सरकारशी पत्र व्यवहार करून देखील चाळीसगाव येथील घरेलू कामगार महिलांना शासनाकडून कुठलाही लाभ मिळाला नसल्याने महिला दिनाचे औचित्य साधून घरेलू कामगार महिलांनी येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन करून मागण्यांचे निवेदन तहसीलदार कैलास देवरे यांना देण्यात आले आहे. घरेलू कामगारांच्या योजना पुनश्च सुरु करून त्यांना कामगार म्हणून मान्यता मिळावी. जिल्ह्यात तालुका स्तरावर नोंदणी प्रक्रिया सुरु करावी. आवश्यक मनुष्य बळ व यंत्रणा पुरवावी. अन्न सुरक्षा योजनेअंतर्गत कामगारांना त्याचा लाभ मिळून योजनेत समाविष्ट करावे. नोंदणीकृत घरेलू कामगारांना केंद्र व राज्य सरकारच्या सर्व योजनांमध्ये लाभार्थी म्हणून जाहीर करावे. निवृत्ती वेतन म्हणून दरमहा 3 हजार रुपये देण्यात यावे. कामगारांच्या पाल्यांना मोफत शिक्षण द्यावे. 55 ते 60 वर्षाच्या वयाच्या सर्व घरेलू कामगारांना 10 हजार रुपये देण्यात यावे आदी मागण्यांसाठी भारतीय मजदूर संघ चाळीसगाव तालुका संलग्न घरेलू महिला कामगारांनी घरेलू कामगार संघाचे जिलाध्यक्ष सदाशिव सोनार यांच्या मार्गदर्शनाखाली 8 मार्च 2017 रोजी येथील तहसील कार्यालयासमोर एक दिवसीय धरणे आंदोलन केले. त्यानंतर दुपारी तहसीलदार कैलास देवरे यांना मागण्याचे निवेदन देऊन आंदोलनाची सांगता करण्यात आली. यावेळी सदाशिव सोनार, तात्या भालेराव, सोनाली लोखंडे, हर्षदा काटकर, लताबाई मस्तूद, एस एस महाले, रंजना पाटील यांचे सह शेकडो महिला आंदोलनात सहभागी झाल्या होत्या.

महिला नागरसेविकेसह महिलांनी केली शौचालय व गटारींची स्वछता
चाळीसगाव : शहरातील प्रभाग क्र.14 मधील इस्लामपूरा भागातील महिला शौचालयाची व गटारींची साफ सफाई होत नसून प्रभागात घाणीचे साम्राज्य प्रसरले आहे. न पा मुख्यधिकार्यांना पत्र देऊन देखील याकडे लक्ष दिले जात नसल्याने अखेर महिला दिनी महिला नगरसेविका व महिलांनी शौचालय व गटारींची स्वच्छता केली आहे. प्रभाग क्र 14 इस्लामपुरा भागातील नगरसेविका बेग यास्मिनबी फकिरा यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे कि, त्यांच्या प्रभागात महिला सौचालयाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. गटारींची साफसफाई होत नाही त्यामुळे समस्या निर्माण झाल्या आहेत. याबाबत त्यांनी संबधित स्वच्छता निरिक्षक यांना सांगितल्यानंतर ते उडवाउडवीची उत्तरे देतात त्याच प्रमाणे न.पा. मुख्यधिकऱयांना पत्रव्यवहार करून देखील याकडे लक्ष दिले जात नाही. अखेर महिला दिनी त्यांनी महिलांना सोबत घेऊन स्वतः त्यांचे सोबत सौचालाय व गटारींची साफसफाई केली. नगरपालिका याकडे लक्ष देत नसल्याने महिला वर्गामध्ये नाराजी व्यक्त होत असून प्रभागात नियमित साफसफाई व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

रांजणगाव माध्यमिक विद्यालयातर्फे विद्यार्थींनींचा सत्कार

रांजणगाव माध्यमिक विद्यालयात महिला दिनानिमित्त गरीब होतकरु गुणवंत विद्यार्थीनींचा सत्कार करण्यात आला. विविध स्पर्धेत यश मिळविणार्‍या खेळाडुंचा रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. रांजणगाव येथील काही व्यक्तिंनी मिळून त्यांच्या बँकेतील ठेवी मधुन मिळालेल्या व्याजाच्या रकमेतुन विद्यार्थींनीना आर्थिक मदत दिली. बक्षिस वितरण प्रसंगी मुख्याध्याप एस.देशमुख, माजी मुख्याध्यापक पाठक, डी.पी.पाटील, शेखर निंबाळकर, प्रमोद चव्हाण यांच्यासह शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

जामडी येथे आरोग्य शिबिर उत्साहात
चाळीसगाव । तालुक्यातील जामडी येथे जागतिक महिला दिन व रयत सेनास्थापना दिना निमित्त आरोग्य शिबिर घेण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन रयत सेनेचे शेतकरी सेना जिल्हाअध्यक्ष दिपक राजपुत यांनी केले होते. नेत्र रोग व महिला आरोग्य शिबिरात जवळपास 150 महिला व पुरूषांची मोफत तपासणी डॉ.सी.एस.मोरे यांनी केली. मदतनिस म्हणून विनायक ठाकरे, श्याम गोसावी यांनी सहकार्य केले. स्री रोग शिबिरात 25 महिलांची मोफत तपासणी डॉ.अनस खान यांनी केले. रयत सेना शाखा उद्घाटन प्रसंगी बोलताना संस्थापक अध्यक्ष गणेश पवार यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचस जामडी सरपंच युसुफ शेख, पोपा रायसिग, वाघडुचे माजी सरपंच भाऊसाहेब पाटील, रयत सेनेचे पी.एन. पाटील, प्रमोद वाघ, पप्पु पाटील, जिल्हाअध्यक्ष संजय कापसे, शेतकरी सेना जिल्हाध्यक्ष दिपक राजपुत, शेतकरी सेना तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील, तालुका उपाध्यक्ष मुकुंद पवार, विलास मराठे, अनिल पाटील, विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष सप्निल गायकवाड, विद्यार्थी सेना तालुकाध्यक्ष पंकज पाटील, सुकदेव पाटील, भैय्या पाटील, भुषण पाटील अजय चव्हाण, राकेश देशमुख, दिनेश जगताप, जामडीचे गोकुळ परदेशी, उमराव परदेशी, शाम परदेशी, राजेंद्र परदेशी, देवसिग परदेशी, बाबु नाईक, नबी दादा, सोनु परदेशी, अनवर इमाम, विजय परदेशी, रणजित परदेशी, बजरंग परदेशी, प्रदीप परदेशी, भैय्या बद्रीदिन मयजुद, छोटु कुरबा, नाना मानसिग, शाम परदेशी, बापु पाटील, मोइदीन, समाधान परदेशी, सचिन परदेशी, महेंद्र परदेशी, संजु पाटील, अमरसिंग जयसिंग, सरदार परदेशी, राऊसाहेब परदेशी, भीमसिंग परदेशी, सागर नागणे आदि पदाधिकारी व कार्येकर्ते उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षक सेना शहराध्यक्ष सचिन नागमोती यांनी केले तर आभार भगवान परदेशी यांनी मानले.