महिलांच्या आरोग्यासाठी सर्वप्रथम प्राधान्य देणार

0

मुक्ताईनगर । माझे पती छोटू भोई हे शिवसेनेचे तालुकाध्यक्ष असून त्यांच्या समाजसेवेच्या प्रेरणेतून मला समाजसेवा करायला आवडेल. मी विशेषत: महिलांसाठी व गोरगरीब जनतेसाठी मझ्या पतीच्या समाजसेवेच्या कौशल्याचा वापर करुन घेईल व त्यामाध्यमातून गावातील प्रश्‍न मार्गी लावण्याचा प्रयत्न करेल. शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत पाटील यांनी मुक्ताईनगर गणातील सर्वसाधारण महिला राखीव जागेतून विश्‍वासाने दिलेल्या उमेदवारीचा जनकल्याणासाठी उपयोग करणार. विशेषत: महिलांच्या हिताला प्राधान्य देणार असल्याचे भारती छोटू भोई यांनी सांगितले.

विविध योजनासाठी प्रयत्नशिल

जनतेने मला मुक्ताईनगर गणातून पंचायत समितीमध्ये संधी दिल्यास प्रथम महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने काम करण्यास तत्पर राहील. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून गणातील शुध्द पाण्याचा पुरवठा घरोघरी नेण्यासाठी प्रयत्नशील राहिल. शहरातील गटारींचे व्यवस्थापन करेल. शेतकर्‍यांना विविध योजनांचा लाभ मिळण्यासाठी प्रयत्नशील राहिल. आदिवासी व दलित समाजाच्या नागरिकांसाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार. गोरगरीबांची तसेच सर्वसामान्य जनतेची कामे व्हावी. यासाठी मी शिवसेनाच्या माध्यमातून उमेदवारी घेतली आहे.

गणासाठी करणार विकास कामेे

शुध्द पाणी पुरवठा, शहरातील गटारींचे व्यवस्थापन, शेतकर्‍यांसाठी पंचायत समितीमार्फत येणार्‍या विविध योजना राबविणे, लाभ मिळवून देणे शेती रस्ते, महिलांच्या आरोग्य विषयक योजना राबविणे, शहराअंतर्गत येणार्‍या रस्त्यांची दुरुस्तीची कामे करणार. तसेच येथील वृद्ध नागरिकांना इंदिरा आवास, श्रावण बाळ, संजय गांधी निराधार योजना अशा विविध योजनाचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याची माहिती भारती सोनवणे यांनी दिली.