महिलांची अवैध धंदे बंद करण्याची मागणी

0

जळगाव । इच्छादेवी चौफुलीवर सुरू असलेल्या सट्टा मटका ताबडतोब बंद करण्यात यावा, या मागणीसाठी पंचशिलनगर, इच्छादेवी, तांबापूर या भागातील त्रस्त महिलांनी पोलीस उपअधिक्षक सचिन सांगळे यांना बुधवारी निवेदन दिले. तसेच या चौकांतून शहरात शाळकरी मुले, मुली ये-जा करीत असतात. या परिसरातील महिला सिंधी कॉलनी येथे भाजीपाला घेण्यासाठी जावे लागते. या महिला व मुलींना इच्छादेवी चौकांत सटोडे लोकांकडून त्रास दिला जातो. दर दोन दिवसाआड किरकोळ कारणावरून या ठिकाणी भांडणी नेहमी होत असतात.

हिंदू-मुस्लीम वाद उफळण्याची भिती
या छेडखानीतून हिंदू, मुस्लीम वाद उफळण्याची शक्यता दिलेल्या निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे. महिलांना पाहून त्या ठिकाणी टवाळखोर व्यक्ती उघड्यावरच लघंशंका करीत असतात. महिलांना होणारा त्रास थांबावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. अन्यथा सर्व त्रस्त महिला रास्तारोक करून आंदोलन करतील व त्याला पोलीस प्रशासन जबाबदार राहील असा इशारा देखील निवेदनात देण्यात आला आहे. निवेदनावर परिसरातील शबाना बी,साजन बी,साजेदा बी हुसेन,बेबीबाई वसंत कोळी,सुरेखा आदि महिलांच्या सह्या आहेत.